Jump to content

"ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३६९: ओळ ३६९:
== खासगी वाहतूक व्यवस्था ==
== खासगी वाहतूक व्यवस्था ==


येवड्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतानाही ठण्यता खासगी वाहतूक व्यवस्था ही अजुन एक परियाय देते प्रवाशाना. मुख्य तर मोठे मोठे रहवाशी काम्प्लेक्सचे स्वताचे बस सेवा आहे. ज्याचे थांबा ठाणे स्तानकाच्या पशिम व पूर्वेत आहे. ही खासगी वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपुरी असल्या मुले अस्तित्वात आहे.
येवढ्या विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतानाही, मोठमोठ्या रहिवासी संकुलांची यांची खासगी वाहतूक व्यवस्था आहे. या खासगी बससेवेचे थांबे ठाणे स्थानकाच्या दोन्ही बाजूला आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्यामुळेच ही खासगी बससेवा अजून अस्तित्वात आहे.


=== ऑटो रिक्शा ===
=== ऑटो रिक्शा ===
ऑटो रिक्शा सुरवातीचे मीटर भाड़े १० रुपये आहे. ठाणे शहरत प्रवास करण्यास ऑटो रिक्शा हा मस्त व सवस्त परियाय आहे. ठाणे शहरात प्रवास लवकर करण्यास ऑटो चगलीच मदत करते. ठान्यातले कही मदले रस्ते वापरले जातात जे मुख्य रस्त्याना जोड़ते.
ऑटो रिक्शाचे मीटर भाड़े पहिल्या १.६ किलोमीटरला १० रुपये आहे. पुढे त्याचा दर थोडा कमी आहे. ठाणे शहरात प्रवास करण्यास ऑटो रिक्शा हा मस्त व स्वस्त पर्याय आहे. ठाणे शहरातील रुंद रस्त्यांखेरीज लहानलहान रस्त्यांनी धावत असल्याने रिक्षाने ठाण्यातल्या ठाण्यात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी लवकर पोचता येते.
स्थानिक ऑटो रिक्शा फक्त ठाणे शहराच्या हद्दीत चालते, म्हणजे या रिक्षात बसून टोलनाका ओलांडून दुसर्‍या शहरात प्रवेश करता येत नाही. मुंबई (मुलुंड)च्या दिशेने प्रवास करायचा असेल तर मुलुंड चेक नाक्याला रिक्शा बदलून मुंबई उपनगरात धावणारी रिक्शा घ्यावी लागते. मुलुंड चेक नाके दोन आहेत, एक आग्रा रोडवर आणि दुसरा पूर्व गतिमार्गावर.

ऑटो फक्त ठाणे शहराच्या हद्दीत चलते जे एक टोलनका ते दुसरया टोलनका परियंत सेवा देते. पण तुम्हाला मुंबई (मुलुंड)च्या दिशेने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला मुलुंड चेकनकाला ऑटो बदलावी लागेल जी मुंबई उपनगराच्या दिशेने जाते.


----
----
ओळ ३८१: ओळ ३८०:
=== टॅक्सी ===
=== टॅक्सी ===


नाशिक, पुणे व मुंबईला प्रवास करण्यास खासगी टॅक्सी हा एक अजुन एक परियाय आहे. ठाणे शहराला जवलचे विमानतळ हे मुंबई विमानतळ आहे खासगी टॅक्सी या मार्गातिल प्रवाशीना सेवा पुरवते. ठान्यातले मुख्य खासगी टॅक्सी स्टैंड या ठिकाणी आहे:
नाशिक, पुणे व मुंबई या शहरातील काही एका ठरावीक ठिकाणापर्यंत जाण्यासाठी परवानाप्राप्त खासगी टॅक्सी हा एक पर्याय आहे. ठाणे शहराजवळच्या मुंबई विमानतळाला जाण्यासाठी खासगी टॅक्सी मिळतात. ठाण्यातले मुख्य खासगी टॅक्सी स्टॅन्ड खालील ठिकाणी आहेत.
१) ठाणे रेलवे स्तानक ()
१) ठाणे रेलवे स्थानक (पश्चिम)
२) मुलुंड - ठाणे चेकनका (लाल बहादुर शास्त्री मार्गवरील)
२) मुलुंड - ठाणे चेक नाका (लाल बहादुर शास्त्री मार्ग-आग्रा रोडवरील)


----
----
ओळ ३९०: ओळ ३८९:
=== वातानुकूलित टॅक्सी ===
=== वातानुकूलित टॅक्सी ===


वेगवेगळ्या खासगी वातानुकूलित टॅक्सी ठाणे शहरात आपली सेवा देतात. कही मुख्य खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा आहेत:
वेगवेगळ्या खासगी वातानुकूलित टॅक्सी ठाणे शहरात आपली सेवा देतात. मुख्य खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा खालीलप्रमाणे.
* कूल कैब्स
* कूल कॅब्ज़
* मेरू
* मेरु
* मेगा कैब्स
* मेगा कॅब्ज़


ही सेवा ते मुंबई विमानतळ ठाणे / मुंबईच्या जवालपास इतर मुख्य शहरत सेवा पुरवते. या खासगी वातानुकूलित टॅक्सीचे दूरध्वनी क्र. आहेत ज्य़ाने या सेवेचा लाभ कुठेही व कधीही मिळू शकते.
या टॅक्सीने ठाणे शहरातील घरापासून ते मुंबई विमानतळाला वा पुणे-नाशिक-सुरत सारख्या जवळच्या शहराला जाता येते. या खासगी वातानुकूलित टॅक्सीला दूरध्वनी करून घरी किंवा कुठेही बोलावता येते.


----
----

२१:५०, ३ मे २०१० ची आवृत्ती

ठाणे हे शहर इतर प्रदेशांशी रेल्वे आणि मोटार रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा ठाणे शहरामधून जातो.

लोहमार्ग (रेल्वे) वाहतूक

ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे आणि हार्बर उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

चित्र:ठाणे रेल्वे स्थानक.jpg
ठाणे रेल्वे स्थानक

मध्य रेल्वे उपनगरीय मार्ग

मेन लाइन

हार्बर लाइन

ठाणे हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. ठाणे ↔ वाशी ही स्थानिक रेल्वेसेवा डिसेंबर २००६ पासून, तर ठाणे ↔तुर्भे ↔नेरूळ ↔पनवेल ही सेवा १०-१-२००९ पासून सुरू आहे.

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या

मार्ग वाहतूक

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी-ठाणे म्य़ुनिसिपल ट्रान्सपोर्ट.)

चित्र:ठाणे महानगरपालिका परिवहन .jpg
टी. एम. टी नवीन बस
चित्र:JNNURM.png
टी. एम. टी नवीन JNNURM बस


ठाणे महानगर पालिकेने ९ फेब्रुवारी १९८९ पासून शहरान्तर्गत वाहतुकीसाठी एक स्वतंत्र बससेवा सुरू केली. ती ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. ी.-ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट).[] या नावाने ओळखली जाते. टी. एम. टी. ची सर्व आगारे ठाण्यात आहेत. कळवा आगार(डेपो) हा सर्वात मोठा आगार आहे. टी. एम. टी. च्या बसगाड्या मुख्यत: ठाणे शहरात धावतात. त्यातल्या काही कळवा आणि मुम्ब्रालादेखील जातात.
तसेच, थोड्या बसगाड्या ठाणे महापालिकेचा हद्दीबाहेर इतर महानगरपालिकांमधील खालील ठिकाणापर्यंत जातात. ती ठिकाणे अशी : मीरा-भायंदर महापालिकेच्या हद्दीतले, मीरा रोड रेलवे स्थानक(पूर्व); मुंबई शहराच्या हद्दीतले मुलुंड रेलवे स्थानक व केळकर महाविद्यालय; नव्या मुंबईतले आनंद नगर व गणपतिपाडा.

विषय माहिती
बसगाड्या २८९
बसमार्ग ४५
आगारे २ (कळवा आगार व वागळे इस्टेट आगार)
बस स्टॅन्ड
बस थांबे ३७४ []
दैनंदिन एकूण प्रवास(किलोमीटर) ६३१३५
बसगाड्यांच्या एकूण दैनंदिन फेर्‍या ७११४
दैनंदिन बस प्रवासी २८००१७
दैनंदिन उत्पन्न(रुपयांत) १३८८५४७/-
बसगाडीचा सरासरी रोजचा प्रवास (किलोमीटर) २११
कर्मचारी संख्या २५५८ []

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट)

चित्र:बेस्ट.jpg
बेस्ट बस
चित्र:बेस्ट मुंबई किंगलाँग.jpg
नवीन सी एन जी इँधनावर चालणारी बेस्टची किंगलाँग बस

ठाणे शहरात येणारी बीईएस्‌टी(बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ऍन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी) ही दुसरी मोठी सार्वजनिक बस परिवहन सेवा आहे. ही कंपनी ठाण्यासाठी मर्यादित थांबे असलेली बस सेवा पुरवते. ठाण्यातील तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, बाळकुम, लोधा पॅराडाइस, हि्रानंदानी इस्टेट, वृंदावन सोसायटी, ब्रह्मांड आणि ठाणे पूर्व स्थानकापासून बीईएस्‌टीच्या बसगाड्या मुंबई शहराकडे जातात.

बस प्रकार बस क्रमंक सुरुवात शेवट(ठाणे) मार्गे
वातानुकूलित ए एस १ बॅकबे आगार(मुंबई) कॅडबरी जंक्शन इ.एक्स.महामार्ग
वातानुकूलित ए एस ३ नेहरू तारांगण (वरळी, मुंबई) कॅडबरी जंक्शन(ठाणे) [] इ.एक्स.महामार्ग
वातानुकूलित ए एस ५ कुर्ला टेलिफोन स्टोअर्स कॅडबरी जंक्शन वान्द्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गे
वातानुकूलित जलद ए १३ जलद बॅकबे आगार हिरानंदानी इस्टेट / लोधा पॅराडाइस इ.एक्स.महामार्ग उड्डनपुल, घोडबंदर रोड
वातानुकूलित ए एस ३०२ माहीम बस स्थानक / वांद्रे-कुर्ला संकुल (आय सी आय सी आय) ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) ल.बी.स.मार्ग
मर्यादित ३९९ मर्या ट्रॉंम्बे मॅरेथॉन चौक ल.बी.स.मार्ग
मर्यादित ४५३ मर्या वडाळा आगार मॅरेथॉन चौक(ठाणे) ल.बी.स.मार्ग
वातानुकूलित ए एस ४५८ प्रबोधनकार ठाकरे नगर बस स्थानक(चारकोप) महाराणा प्रताप चौक (मुलुंड चेकनाका) घोडबंदर रोड, वे.एक्स.महामार्ग, स.वी.रोड
मर्यादित ४९१ मर्या सीप्ज़(अंधेरी) ब्रम्हांड घोडबंदर रोड, वे.एक्स.महामार्ग
मर्यादित ४९३ मर्या राणी लक्ष्मीबाई चौक(सायन सर्कल) बाळकुम इ.एक्स.महामार्ग
मर्यादित ४९४ मर्या घाटकोपर आगार रेतीबंदर (कळवा) इ.एक्स.महामार्ग
सामान्य ४९५ गवाणपाडा (मुलुंड-पूर्व) हरी ॐ नगर इ.एक्स.महामार्ग
मर्यादित ४९६ मर्या आगरकर चौक(अंधेरी) मॅरेथॉन चौक ल.बी.स.मार्ग
मर्यादित ४९७ मर्या विक्रोळी आगार लोकमान्य टिळक नगर ल.बी.स.मार्ग
मर्यादित ४९९ मर्या घाटकोपर आगार वृन्दावन सोसायटी(ठाणे) ल.बी.स.मार्ग
मर्यादित ७०० मर्या बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) इ.एक्स.महामार्ग, घोडबंदर रोड, वे.एक्स.महामार्ग
वातानुकूलित ए एस ७०० मागाठाणे आगार ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) इ.एक्स.महामार्ग,घोडबंदर रोड, वे.एक्स.महामार्ग []



नवी मुंबई महापालिका परिवहन (एन. एम. एम. टी.)

एन. एम. एम. टी.बस

ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यापासून सिडको बस स्टॉप [जवळ :वी.पी.म'स जोशी - बेडेकर महाविद्यालय,(ठाणे रेल्वेस्थानक - पश्चिम)] आणि तिथून ते नवी मुंबई अशी बससेवा नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) पुरवते. त्यांच्या बसेस ठाणे ते वाशी व नेरूळ, तसेच ऐरोली, तुर्भे या मार्गांवरही, धावतात. सगळे मार्ग कळवा ह्या रेल्वे स्थानकाजवळून् जातात.

एन. एम. एम. टी. ठाण्यात चालवते असे काही महत्त्वाचे बस मार्ग. []

बस प्रकार बस क्रमंक सुरुवात (ठाणे) शेवट मार्गे
सामान्य ठाणे रेलवे स्थानक (प) वाशी रेलवे स्थानक
सामान्य ठाणे रेलवे स्थानक (प) दिवानगर सेक्टर १०
सामान्य ठाणे रेलवे स्थानक (प) घणसोली मार्गे पटणी कॉम्प्युटर्स
सामान्य ठाणे रेलवे स्थानक (प) वाशी सेक्टर ६
सामान्य ठाणे रेलवे स्थानक (प) वाशी रेलवे स्थानक मार्गे घनसोली
सामान्य ११ ठाणे रेलवे स्थानक (प) वाशी रेलवे स्थानक मार्गे एम.आय.डी.सी
सामान्य १२ ठाणे रेलवे स्थानक (प) महापे बस स्टॅन्ड
सामान्य २६ ठाणे रेलवे स्थानक (प) खारघर (जलवायु विहार)
सामान्य २७ ठाणे रेलवे स्थानक (प) करावे सेक्टर ४६/४८
सामान्य २८ ठाणे रेलवे स्थानक (प) सी.बी.डी (आर्टिस्ट कॉलनी) मार्गे एम.आय.डी.सी
सामान्य २९ ठाणे रेलवे स्थानक (प) खारघर (जलवायु विहार) मार्गे नेरूळ (पूर्व)
सामान्य ३४ ठाणे रेलवे स्थानक (प) करावे सेक्टर ४६/४८ मार्गे नेरूळ (पश्चिम)

कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन (के.डी.एम.टी)

के.डी.एम.टी बस

कल्याण - डोंबिवली महापालिका परिवहन(के.डी.एम.टी) ने एकमेव बस सेवेची सुरुवात केली आहे. ही बस अक्टूबर २००९ पासून धावते.


बस प्रकार बस क्रमंक सुरुवात शेवट (ठाणे) मार्गे
सामान्य ! कल्याण रेलवे स्थानक (प) तीन हात नाका (मॅरेथॉन चौक) आगरा रोड []

मीरा भायंदर महापालिका परिवहन (एम.बी.एम.टी.)

चित्र:MBMT.jpg
एम.बी.एम.टी.बस

मीरा भायंदर महापालिका परिवहन ही सर्वात नवीन परिवहन सेवा आहे. त्यांची बस दहिसर चेकनाका ते वर्सोवा [ठाणे] चेकनाका अशी सेवा पुरवते. त्यांचा एक बसमार्ग मीरा-भायंदर शहरातून दहिसर चेकनाक्यामार्गे ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत जातो.

बस प्रकार बस क्रमंक सुरुवात शेवट (ठाणे) मार्गे
मर्यादित १० मर्या भायंदर रेल्वे स्थानक (प) ठाणे रेल्वे स्थानक (पू.) घोड़बंदर रोड
सामान्य भायंदर रेल्वे स्थानक (प) घोड़बंदर गाव काशीमिरा[]

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) [एम. एस. आर. टी. सी.]

Shivneri with Asiad Bus at Vandana Depot
चित्र:ST Buses.jpg
New Long MSRTC Buses

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरीवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.

आगार वाहतूक प्रकार ठिकाण बस मार्ग
ठाणे रेल्वे स्थानक एशियाड
एस. टी. सामान्य
ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम बोरीवली, भायंदर, भिवंडी, नालासोपारा, पनवेल
वंदना टॉकीज़ शिवनेरी
एशिआड
एस. टी. सामान्य
३ पेट्रोल पंप, हरिनिवास सर्कल जवळ पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, हुबळी, कारवार, हैद्राबाद, बंगळूर, गोवा
खोपट एशिआड
एस. टी. सामान्य
खोपट, जवळ कैडबरी जंक्शन नाशिक, शिर्डी, धुळे, औरंगाबाद, जळगाव, रत्‍नागिरी, मालवण, अलिबाग, बडोदा, सूरत, अहमदाबाद

खासगी वाहतूक व्यवस्था

येवढ्या विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतानाही, मोठमोठ्या रहिवासी संकुलांची यांची खासगी वाहतूक व्यवस्था आहे. या खासगी बससेवेचे थांबे ठाणे स्थानकाच्या दोन्ही बाजूला आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्यामुळेच ही खासगी बससेवा अजून अस्तित्वात आहे.

ऑटो रिक्शा

ऑटो रिक्शाचे मीटर भाड़े पहिल्या १.६ किलोमीटरला १० रुपये आहे. पुढे त्याचा दर थोडा कमी आहे. ठाणे शहरात प्रवास करण्यास ऑटो रिक्शा हा मस्त व स्वस्त पर्याय आहे. ठाणे शहरातील रुंद रस्त्यांखेरीज लहानलहान रस्त्यांनी धावत असल्याने रिक्षाने ठाण्यातल्या ठाण्यात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी लवकर पोचता येते. स्थानिक ऑटो रिक्शा फक्त ठाणे शहराच्या हद्दीत चालते, म्हणजे या रिक्षात बसून टोलनाका ओलांडून दुसर्‍या शहरात प्रवेश करता येत नाही. मुंबई (मुलुंड)च्या दिशेने प्रवास करायचा असेल तर मुलुंड चेक नाक्याला रिक्शा बदलून मुंबई उपनगरात धावणारी रिक्शा घ्यावी लागते. मुलुंड चेक नाके दोन आहेत, एक आग्रा रोडवर आणि दुसरा पूर्व गतिमार्गावर.


टॅक्सी

नाशिक, पुणे व मुंबई या शहरातील काही एका ठरावीक ठिकाणापर्यंत जाण्यासाठी परवानाप्राप्त खासगी टॅक्सी हा एक पर्याय आहे. ठाणे शहराजवळच्या मुंबई विमानतळाला जाण्यासाठी खासगी टॅक्सी मिळतात. ठाण्यातले मुख्य खासगी टॅक्सी स्टॅन्ड खालील ठिकाणी आहेत.

१) ठाणे रेलवे स्थानक (पश्चिम) २) मुलुंड - ठाणे चेक नाका (लाल बहादुर शास्त्री मार्ग-आग्रा रोडवरील)


वातानुकूलित टॅक्सी

वेगवेगळ्या खासगी वातानुकूलित टॅक्सी ठाणे शहरात आपली सेवा देतात. मुख्य खासगी वातानुकूलित टॅक्सी सेवा खालीलप्रमाणे.

  • कूल कॅब्ज़
  • मेरू
  • मेगा कॅब्ज़

या टॅक्सीने ठाणे शहरातील घरापासून ते मुंबई विमानतळाला वा पुणे-नाशिक-सुरत सारख्या जवळच्या शहराला जाता येते. या खासगी वातानुकूलित टॅक्सीला दूरध्वनी करून घरी किंवा कुठेही बोलावता येते.


ठाणे शहराला जोडणारे रस्ते

ठाणे हे मुंबईला जानारया मुख्य द्वार मार्गात ५ पैकी २ मर्गाची सुरवात होते. द इएसटर्न एक्सप्रेस हाईवे (राषट्रीय महामार्ग ३) व लाल बहादुर शास्त्री मार्ग . (बाकि तीन (३) गोरेगांव लिंक रोड मार्गे नवी-मुंबई,चेम्बूर आणि दहिसर).

घोड़बंदर रोड हा ठाण्याला व पूर्व मुंबईला, पशिम मुंबईला जसे बोरीवली व मीरा रोडला जोडनारा एक मुख्य मार्ग आहे. आगरा रोड हा कल्याण, भिवंडी व डोम्बिवली या शहरा कड़े जाणारे एक मुख्य मार्ग आहे.

वाहतूक समस्या

ठाणे शहरातील वाहतुकीचे भविष्य

लाइट रेल सेवा ४२ क.मी. च्या लम्बिची असणार व ही योजना तीन (३) तप्यात पूर्ण करन्यंत येईल. पहिला तप्पा हा बालकुम आणि कोल्शेत मार्गे नौपाडा आसा असेल अणि अंतर असेल १६.०५ क.मी. या तप्प्यत १४.६५ क.मी. जमीनी पासून वर्ती असेल तर फक्त १.४ क.मी. जमीनी वर असेल. अणि त्याला ११ स्तानक असतील. []

ठाणे शहरात मेट्रो रेल सेवा शुरू करण्याची योजना आहे पण ही योजना आता प्राथमिक विचारत आहे. मेट्रो विषयी कुठलेही कार्यत सुरुवात झाली नाही.

हे पहा

संदर्भ