"सुनंदा पुष्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुनंदा पुष्कर या पोष्कर नाथ दास या काश्मिरी पंडितांच्या कन्यका. त...
(काही फरक नाही)

२१:०९, २० एप्रिल २०१० ची आवृत्ती

सुनंदा पुष्कर या पोष्कर नाथ दास या काश्मिरी पंडितांच्या कन्यका. त्यांचे वडील लष्करातून लेफ़्टनन्ट कर्नल या पदावरून निवृत्त झाले व काश्मीरमध्ये स्थायिक झाले. १९९० मध्ये काश्मिरी अतिरेक्यांनी त्यांचे घर हिंसाचारात पेटवले आणि दास कुटुंबीय जम्मूला येऊन स्थायिक झाले. त्यांच्या काश्मिरातील जन्मगांवी, सुनंदा या एक बंडखोर महिला म्हणून ओळखल्या जातात. आपल्या वडिलांच्या नांवात थोडा बदल करून सुनंदाबाईंनी पुष्कर हे आडनाव लावायला सुरुवात केली. कर्मठ काश्मिरी ब्राह्मणांना हे वागणे रुचले नव्हते. त्यांच्या या नावबदलावर बराच वाद झाला, पण त्याची पर्वा सुनंदा यांनी केली नाही. त्यांना दोन भाऊ आहेत. एक बॅंकिंग क्षेत्रात आणि दुसरा लष्करात. सुनंदा पुष्कर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीनगर(काश्मीर) येथे झाले. महाविद्यालयात त्या एक आधुनिक धाटणीची मुलगी म्हणून ओळखल्या जात. दिल्लीत एका हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या एका काश्मिरी युवकाशी झालेला त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही. घटस्फोटानंतर त्यांनी एका दुबईस्थित उद्योगपतीशी लग्न केले. दुबईतील टीकॉम या सरकारी कंपनीत त्यांनी नोकरी धरली. एकोणीसशे नव्वदच्या दशाकात झपाट्याने वाढणार्‍या दुबईत नामांकित कंपन्यांची दुकाने होती. कंपनीच्या विक्री व्यवस्थापक म्हणून वावरताना त्यांनी अनेक नामवंतांशी ओळखी करून घेतल्या. त्यांतून त्यांचा वावर दुबईतील उच्चभ्रूंमध्ये सुरू झाला. या नंतर त्यांनी दुबईत एक स्पा काढला. जगभरातील वलयांकित व्यक्ती या आरोग्यस्नानगृहाला भेटी देऊ लागल्या, आणि सुनंदा पुष्करनामक एका छोट्या काश्मिरी गावात जन्मलेल्या मुलीचा जागतिक पातळीवर मोहमयी जगात प्रवेश झाला.

भारतीय सरकारातील परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांची मैत्रीण असलेल्या सुनंदा पुष्कर यांना आय.पी.एल.च्या कोची फ़्रॅन्चायझीमध्ये सत्तर कोटी रुपयांचे समभाग बक्षिसादाखल मिळाले. यावर गदारोळ झाल्याने शशी थरूर यांचे मंत्रिपद धोक्यात आले. ते वाचावे म्हणून सुनंदा पुष्कर यांनी ते समभाग परतही केले. परंतु त्याचा काहीही उपयोग न होता थरूर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.