"विनायक जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विनायक जोशी (जन्म : ११ मे १९६१; मृत्यू : १५ फेब्रुवारी, २०२०) हे मराठ... |
(काही फरक नाही)
|
१९:५६, १६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
विनायक जोशी (जन्म : ११ मे १९६१; मृत्यू : १५ फेब्रुवारी, २०२०) हे मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे एक गायक होते. ते बँक ऑफ इंडियात नोकरी करत होते.
विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस.के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
विनायक जोशी हे [[सुधीर फडके[[ स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. 'गीत नवे गाईन मी', 1सरींवर सरी', 'बाबुल मोरा', 'चित्रगंगा', 'स्वरभावयात्रा', 'तीन बेगम आणि एक बादशहा' यांसारख्या असंख्य सांगीतिक कार्यक्रमांचे ते संकल्पक होते.
विनायक जोशी यांनी सादर केलेले कार्यक्रम
- वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला 'वसंत बहार'
- गझलकार संदीप गुप्ते यांच्या गजलांवर आधारलेला 'जरा सी प्यास'
- खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या माहितीपूर्ण निवेदनासह साकारलेला 'सूर नभांगणाचे'
- [[सुधीर फडके यांणी गायलेल्या/संगीत दिग्दर्शन केलेल्या गीतांवर आधारित 'भाभी की चूडियॉं'
- वसंत आजगावकर-मधुकर जोशी यांच्या गीतांना ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने बेतलेला 'करात माझ्या वाजे कंकण', वगैरे.