"दीपक शिकारपूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डाॅ. दीपक शिकारपूरकर हे इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीचे जागतिक कीर्त... |
(काही फरक नाही)
|
१३:३४, १२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
डाॅ. दीपक शिकारपूरकर हे इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीचे जागतिक कीर्तीचे इंजिनिअर आहेत.
लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी असलेले शिकारपूरकर यांनी इंजिनिअरिंगची परीक्षा विशेष गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन विषयात एक पादव्युत्तर पदविकाघेतली आणि नंतर इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी हा विषय घेऊन ते पीएच.डी. झाले. ते जगातील अनेक इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी संस्थांचे आणि शिक्षणसंस्थांचे डायरेक्टर आहेत.
दीपक शिकारपूरकर हे काँप्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष व काँप्युटर लिटरसी टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. सन २०१४ ते २०१६ या काळात ते महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे कार्यकारी प्रमुख सदस्य होते. मराठा वेंबर ऑफ काॅमर्स, उद्योग अणी शेती या संस्थेचे ते सभासद आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या ॲकॅडमिक काउंन्सिलचे सदस्य असून ते पुण्यातील भारतीय विद्या भवनच्या कार्यकारी मंडळावर आहेत. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्स, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स आणि काँप्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे ते मानद फेलो आहेत.
दीपक शिकारपूर हे लेखकही आहेत. त्यांनी त्यांच्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :
- आयटी करियर्स २०२०
- कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव
- सोशल मीडिया - शाप की वरदान?
(अपूर्ण)