Jump to content

"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:




;साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक) :
==साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक)==

* अर्धरेशमी
* अर्धरेशमी
* ऑरगंडी
* ऑरगंडी
* ऑरगेंझा साडी
* ऑरगेंझा साडी
* रुंद काठाची साडी
* काठा पदराची साडी
* कोयरीकाठी साडी
* चौकटीची साडी
* छापाची साडी
* दंडिया (सहावारी साडी)
* पट्ट्यापट्ट्याची साडी
* पाचवारी साडी
* रुंद पदराची साडी
* रेशमी साडी
* कृत्रिम रेशमी साडी
* सहावारी साडी (दंडिया)
* सुती साडी
* सुरतेची साडी
* सेलम साडी
* हातमागाची साडी

==रेशमी साड्यांचे प्रकार==
* आसामी
* आसामी
* ओरिसी (संबलपुरी, इक्कत, बोमकल साडी)
* ओरिसी
* इक्कत
* इक्कत
* उत्तर प्रदेशची मलबारी सिल्क साडी, जामदानी, जामेवार
* इंदुरी
* इंदुरी
* इरकल (इल्लकल्ल)
* इरकल (इल्लकल्ल)
ओळ ३२: ओळ ५०:
* कलमकारी
* कलमकारी
* कांचीपुरम ([[कांजीवरम]])
* कांचीपुरम ([[कांजीवरम]])
* छत्तीसगडी कांठा साडी
* छत्तीसगडी कांठा साडी (राॅ सिल्क साडी)

* रुंद काठाची साडी
* काठा पदराची साडी
* कामीन
* कामीन
* काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
* काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
* कुर्गी
* कुर्गी
* कोईमतूर साडी (तमिळनाडू)
* कृत्रिम रेशमी साडी

* कोईमतूर साडी
* कोसा साडी (छत्तीसगड)
* कोयरीकाठी
* कोसा साडी
* क्रेप प्रिंटिंगची साडी
* क्रेप प्रिंटिंगची साडी
* खडीकामाची
* खडीकामाची
ओळ ५६: ओळ ७२:
* चिटाची
* चिटाची
* चिनार
* चिनार

* चौकटीची साडी
* छापाची साडी
* जपानी साडी
* जपानी साडी
* जरतारी
* जरतारी
ओळ ९०: ओळ १०५:
* नारायण पेठ
* नारायण पेठ
* पटोला
* पटोला

* पट्ट्यापट्ट्याची साडी
* पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
* रुंद पदराची साडी
* पाचवारी साडी
* पावडा साडी
* पूना साडी
* पूना साडी
* पेशवाई नऊवारी लुगडे
* पेशवाई नऊवारी लुगडे
ओळ १०७: ओळ १२०:
* बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
* बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
* बालुचारी
* बालुचारी
* बिहारची ऑर्गॅनिक टसर साडी
* बुट्ट्याची साडी
* बुट्ट्याची साडी
* बेळगाव साडी
* बेळगाव साडी
ओळ १३२: ओळ १४६:
* ओरिसाची संबळपुरी/संभलपुरी साडी
* ओरिसाची संबळपुरी/संभलपुरी साडी
* सासर-माहेर साडी
* सासर-माहेर साडी
* सुंगडी मदुराई
* सुंगडी (मदुराई)
* सुती साडी
* सुरतेची साडी
* सेलम साडी
* हातमागाची साडी


==साडी नेसण्याचे प्रकार==
==साडी नेसण्याचे प्रकार==

१४:४०, ३० जानेवारी २०२० ची आवृत्ती

साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते.

प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो २ रे शतक

निऱ्या

साडी कमरेभोवती गुंडाळल्यावर जास्तीचा राहिलेला भाग घड्या घालून नाभीपाशी खोचला जातो त्याला निऱ्या म्हणतात.

काठ

साडीचा जमिनीकडे असणारा तळाचा भाग म्हणजे साडीचा काठ होय. साडीच्या काठावर असणाऱ्या विवक्षित नक्षीमुळे काही साड्यांचे प्रकार सहज ओळखता येतात.

पदर

कमरेला गुंडाळल्यावर उरणाऱ्या साडीच्या आकर्षक तुकड्याला साडीचा पदर, पालव किंवा पल्लू म्हणतात. हा भाग खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. काहीजणी त्याला समोरच्या बाजूनेही घेतात. पदराची जास्तीची लांबी कबरेभोवती लपेटतात व उरलेली कमरेशी खोचतात.

प्रकार

भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा १.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटीमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात.


साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक)

  • अर्धरेशमी
  • ऑरगंडी
  • ऑरगेंझा साडी
  • रुंद काठाची साडी
  • काठा पदराची साडी
  • कोयरीकाठी साडी
  • चौकटीची साडी
  • छापाची साडी
  • दंडिया (सहावारी साडी)
  • पट्ट्यापट्ट्याची साडी
  • पाचवारी साडी
  • रुंद पदराची साडी
  • रेशमी साडी
  • कृत्रिम रेशमी साडी
  • सहावारी साडी (दंडिया)
  • सुती साडी
  • सुरतेची साडी
  • सेलम साडी
  • हातमागाची साडी

रेशमी साड्यांचे प्रकार

  • आसामी
  • ओरिसी (संबलपुरी, इक्कत, बोमकल साडी)
  • इक्कत
  • उत्तर प्रदेशची मलबारी सिल्क साडी, जामदानी, जामेवार
  • इंदुरी
  • इरकल (इल्लकल्ल)
  • इरी सिल्कची (इंडी-इरंडी) साडी
  • उपाडा रेशमी साडी
  • कलकत्ता
  • कलमकारी
  • कांचीपुरम (कांजीवरम)
  • छत्तीसगडी कांठा साडी (राॅ सिल्क साडी)
  • कामीन
  • काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
  • कुर्गी
  • कोईमतूर साडी (तमिळनाडू)
  • कोसा साडी (छत्तीसगड)
  • क्रेप प्रिंटिंगची साडी
  • खडीकामाची
  • खंबायती
  • खादीची साडी (सुती आणि रेशमी)
  • गढवाल (आंध्र प्रदेश)
  • गर्भरेशमी
  • गुजराती साडी
  • घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात..
  • मध्य प्रदेशची चंदेरी साडी
  • चंद्रकळा/काळी चंद्रकळा
  • चायना सिल्कची साडी
  • लखनौ चिकन साडी
  • चिटाची
  • चिनार
  • जपानी साडी
  • जरतारी
  • जरदोजी
  • जरीची/कच्छी जरीकामाची साडी
  • जरीचे काठ असलेली
  • जरीपदरी
  • जाडी भरडी
  • जामदानी
  • जॉर्जेटची साडी
  • जिजामाता
  • जोडाची साडी
  • छापकामाची
  • टमटम साडी
  • भागलपुरी टसर साडी
  • तुर्की साडी
  • टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी : ही साडी बंगालमधील श्रीकलाहस्ती नावाच्या गावात बनते. शेळीच्या दुधाचा वापर करून साडीवर लेखणीने रंगीत नक्षी किंवा चित्रे काढतात. शेंदूर, काजळ, गूळ, जायफळ व हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून साडीवर रंग भरतात. या साडीवर अनेकदा लग्नाच्या वरातीचे पॆंटिंग असते. टसर साडीला दुधाचा सुगंध येतो, तो साडी अनेकदा धुतल्यानंतरही नष्ट होत नाही.
  • ठिपक्याची साडी
  • ढाका साडी
  • राॅ ढाका साडी
  • तंगाईल (जामदानी-पश्चिम बंगाल)
  • तंचोई,तंछोई
  • तबी (टॅबी) सिल्क साडी
  • तलम
  • तुकडा साडी
  • त्रावणकोर
  • दुहेरी पाटन पटोला
  • धर्मावरम
  • धारवाडी
  • नऊवारी साडी
  • नायलॉनची साडी
  • नारायण पेठ
  • पटोला
  • पावडा साडी (हाफ साडी) (तामिळनाडू)
  • पूना साडी
  • पेशवाई नऊवारी लुगडे
  • पैठणी (ही महाराष्ट्राची खासीयत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्याची पैठणी खूप प्रसिद्ध आहे).
  • पोचमपल्ली
  • प्लॅस्टिक जरीची
  • प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
  • फुलकारी (पंजाब)
  • बंगलोरी
  • बंगाली साडी
  • राजस्थानी बंधेज साडी
  • बनारसी शालू
  • बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
  • बालुचारी
  • बिहारची ऑर्गॅनिक टसर साडी
  • बुट्ट्याची साडी
  • बेळगाव साडी
  • भरजरी
  • मंगलगिरी साडी
  • मदुराई
  • मलबारी साडी
  • महेश्वरी
  • मालेगावची साडी
  • मिलची साडी
  • मुंगा सिल्कची साडी (ही साडी आसाममध्ये बनते. मुंगा सिल्कला रंगवता येत नाही, म्हणून ही साडी फक्त क्रीम रंगात असते.)
  • यंत्रमागावरची साडी
  • येवल्याची साडी
  • राजस्थानी साडी
  • शुद्ध रेशमी साडी
  • लखनवी
  • लुगडे
  • वायल
  • वारसोवा साडी
  • विष्णुपुरी
  • व्यंकटगिरी
  • शावारी साडी
  • श्रावणकोर
  • संगमनेरी प्रिंटेड साडी
  • ओरिसाची संबळपुरी/संभलपुरी साडी
  • सासर-माहेर साडी
  • सुंगडी (मदुराई)

साडी नेसण्याचे प्रकार

  • शायना एन.सी. या बाई पाचवारी साडी नेसण्याचे ५५ प्रकार शिकवतात.
  • दिल्लीची एक संस्था साडी नेसण्याचे १२५ प्रकार शिकवण्याचा दावा करते.
  • २८ मार्च २०१२ रोजी नाशिक येथे एका कार्यशाळेत, साडी डे्पिंगमधील तज्ज्ञ नूतन मेस्त्री यांनी उपस्थित महिलांना महाराणी, कुर्गी, टर्की, सासर - माहेर, वार्सोवा, जपानी, नऊवारी, सहावारी या साड्या कशा नेसायच्या हे प्रात्यक्षिकांसह शिकवले होते. साडी केवळ नेसायची कशी हेच नाही, तर प्रत्येक साडी विशिष्ट स्टाईलमध्ये कशी नेसायची याचीही माहिती यावेळी दिली गेली. खादीपासून ते कांजीवरमपर्यंत विविध प्रकारच्या साड्या नेसताना कोणती काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये केले गेले. असेच एक वर्कशॉप महाराष्ट्र टाइम्सतर्फे २४ जानेवारी २०१२ला आयोजित झाले होते.