"चंद्रकांत काकोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चंद्रकांत कल्याणदास काकोडकर (जन्म : काकोडा-गोवा, जन्म २१ मार्च १९... |
(काही फरक नाही)
|
२२:४४, १८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
चंद्रकांत कल्याणदास काकोडकर (जन्म : काकोडा-गोवा, जन्म २१ मार्च १९२१; मृत्यू : २३ नोव्हेंबर १९८८) हे एकेकाळी आपल्या कादंबऱ्यांनी युवापिढीवर अधिराज्य करणारे मराठी लेखक होते.
शरदचंद्र चटर्जीच्या साहित्याचा त्यांच्यावर पगडा असल्याने चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबऱ्यांवर बंगाली जीवनाचा प्रभाव दिसतो. त्यांच्या पहिल्याच तीन कादंबऱ्यांमुळे काकोडकरांचा कादंबरीकार म्हणून गवगवा झाला. त्यांनी अनेक इंग्रजी रहस्यकथांची मराठी रूपांतरे केली.
'चंद्रकांत' आणि 'काकोडकर' या नावांनी त्यांचे दिवाळी अंक प्रकाशित होत.
तथापि काकोडकर गाजले ते प्रेम आणि शृंगार या विषयावर कादंबऱ्या लिहिल्या म्हणून. त्यामुळे त्यांच्यावर यामुळे अश्लीलतेचेही आरोप झाले. इतके की त्यांच्या 'शामा ' ह्या कादंबरीवर खटला भरला गेला. शेवटी सुप्रीम कोर्टात त्यांच्या बाजूने निकाल लागला.
चंद्रकांत काकोडकर यांच्या कादंबऱ्या (एकूण ३००)
- अग्निदिव्य (या कादंबरीवरून 'धाकटी बहीण' हा मराठी चित्रपट निघाला)
- अशी तुझी प्रीती (या कादंबरीवरून 'मै तुलसी तेरे आंगन की ' हा हिंदी चित्रपट निघाला.)
- आसावरी (या कादंबरीच्या आधारे तेलगू चित्रपट निघाला).
- कुणाच्या स्वातंत्र्यासाठी
- गर्जा जयजयकार (या कादंबरीला सुवर्णपदक मिळाले).
- गोमांतका ... जागा हो
- निसर्गाकडे
- प्रतिष्ठा (या कादंबरीवर हिंदी चित्रपट निघाला)आणि '
- सुचित्रा (ही बंगाली जीवनाच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी आहे.)
सन्मान
- चंद्रकांत काकोडकर हे १९व्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.