"नरहर शंकर रहाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नरहर शंकर रहाळकर (जन्म : भडगाव-खानदेश, १८८२; मृत्यू : ७ डिसेंबर १९५७)... |
(काही फरक नाही)
|
१८:४५, १८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
नरहर शंकर रहाळकर (जन्म : भडगाव-खानदेश, १८८२; मृत्यू : ७ डिसेंबर १९५७) हे एक मराठी कवी होते. बालपणापासूनच काव्यरचनेचा नाद असला तरी, जेव्हा त्यांच्या गावी केशवसुत शिक्षक म्हणून आले तेव्हा रहाळकरांच्या काव्यरचनेला भर आला. त्यांची कविता मुख्यतः सन १८९८ ते १९०४ या कालखंडात बहरली. तथापि ते मुख्यतः ओळखले जातात. ते केशवसुतांचे एक आद्य रसिक चाहते, आणि केशवसुतांच्या कवितेचे समीक्षक म्हणून.
रहाळकरांनी बऱ्याच कविता रचल्या. त्यामध्ये 'माझी आई आणि माझ्या आईची तसबीर' ही विलापिका गाजली. यानंतर 'पुष्पांजली, बिल्वदल'सह पाच कवितासंग्रह, वीरधर्मदर्पण (महाभारतातील अभिमन्यूवधापासून जयद्रथवधापर्यंतच्या कथाभागावर आधारित संस्कृत नाटक) व उत्तररामचरित या नाटकांची भाषांतरे व मानाजीराव हे नाटक लिहिले. त्यांचा शाकुंतलसौंदर्य हा टीकात्मक निबंधही गाजला. त्यांचे लिखाण त्याकाळी मासिक मनोरंजनमधून प्रसिद्ध होत असे.
न.शं. रहाळकरांनी केशवसुतांच्या काव्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. ते लेख पुढे 'केशवसुत आणि त्यांच्या कविता' या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.