Jump to content

"विष्णुभट गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वि़्णुभट गोडसे वरसईकर हे कोंकणातील पेण तालुक्यातील वरसई गावचे....
(काही फरक नाही)

२३:३४, १९ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

वि़्णुभट गोडसे वरसईकर हे कोंकणातील पेण तालुक्यातील वरसई गावचे. पेशवाईत त्यांच्या कुटुंबीयांकडे पौरोहित्य व प्रशासकीय जबाबदारी होती. मात्र पुढील काळात कर्जबाजारी होऊन या कुटुंबास आर्थिक हलाखीच्या स्थितीस तोंड द्यावे लागले. त्यामुळे १८५७ च्या सुमारास ग्वाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे या सर्वतोमुख यज्ञ करणार असल्याचे तेथील आप्तांकडून विष्णुभटांना कळताच ते अर्थार्जनासाठी आपल्या काकांबरोबर ग्वाल्हेरला जायचे ठरवतात. आणि त्यांचा उत्तर भारताच्या दिशेने प्रवास सुरू होतो. या प्रवासाचे वर्णन म्हणजेच गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास – १८५७ च्या बंडाची हकीकत’ हे पुस्तक. या पुस्तकामुळे विष्णुभट गोडसे हे मराठी साहित्यात अजरामर झाले. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी केला आहे.



(अपूर्ण)