"चिक चाॅकलेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चिक चाॅकलेट (जन्म : इ.स. १९१६; मृत्यू : मे १९६७) (मूळ नाव - अँटोनिओ झेवि... |
(काही फरक नाही)
|
१३:०७, १७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
चिक चाॅकलेट (जन्म : इ.स. १९१६; मृत्यू : मे १९६७) (मूळ नाव - अँटोनिओ झेवियर वाझ) हे एक ट्रंपेट वादक होते. ते मूळ गोव्याचे राहणारे. मुंबईच्या ताजमहाल हाॅटेलात त्यांचा एक जाझ बँड होता. ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट जाझ संगीतकारांपैकी एक होते.
चिक चाॅकलेट यांनी काही हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजनही केले आहे. त्यांचे ट्रंपेट वादन अनेक ध्वनिमुद्रणांमध्ये ऐकू येते.
हिंदी चित्रपट 'नादान' (सन १९५१)चे ते संगीत दिग्दर्शक होते. 'नादान'मधील तलत महमूद चे 'आ तेरी तसवीर बना लूँ' आणि लता मंगेशकरचे 'सारी दुनिया को पीछे छोडकर' ही दोन गाणी ऐकली तरी चिक चाॅकलेट यांचे संगीतकार म्हणून काॅशल्य नजरेत भरते.
चिक चाॅकलेट हे एन. दत्ता आणि सी. रामचंद्र यांचे चांगले मित्र होते. एन. दत्ता यांची कारकीर्द घडविण्यास चिक चाॅकलट यांचा मोलाचा वाटा आहे.
चिक चाॅकलेट यांचे योगदान असलेले हिंदी चित्रपट
- कर भला (१९५६, संगीत दिग्दर्शन)
- नादान (१९५१, संगीत दिग्दर्शन)
- निराला (१९५०, साहाय्यक संगीत दिग्दर्शक)
- भाई भाई (१९५६ साहाय्यक संगीत दिग्दर्शक)
- रंगीली (१९५२, संगीत दिग्दर्शन)