Jump to content

"दत्ता केशव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
दत्ता केशव (पूर्ण नाव - दत्ता केशव कुलकर्णी) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नावाजलेले नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार आणि संवादलेखक होते.
दत्ता केशव (पूर्ण नाव - दत्ता केशव कुलकर्णी) (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : १८ जानेवारी २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नावाजलेले नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते.


गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे निव्वळ पोटापाण्यासाठी चित्रपटांच्या मायावी दुनियेत सन १९६०च्या दशकात आले. त्यावेळी [[अनंत माने]], [[दत्ता धर्माधिकारी]], [[भालजी पेंढारकर]], [[राजा परांजपे]] यांच्यासारखे नामवंत दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असताना दत्ता केशव यांनी स्वत:ची वाट शोधली आणि नवी ओळख निर्माण केली.
गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे निव्वळ पोटापाण्यासाठी चित्रपटांच्या मायावी दुनियेत सन १९६४ साली आले आणि ४२ वर्षे टिकले. ते आले त्यावेळी [[अनंत माने]], [[दत्ता धर्माधिकारी]], [[भालजी पेंढारकर]], [[राजा परांजपे]] यांच्यासारखे नामवंत दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असताना दत्ता केशव यांनी स्वत:ची वाट शोधली आणि नवी ओळख निर्माण केली.


कौटुंबिक चित्रपट ही दत्ता केशव यांची खासियत होती. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. .
कौटुंबिक चित्रपट ही दत्ता केशव यांची खासियत होती. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता.


==दत्ता केशव यांचे चित्रपट==
==दत्ता केशव यांचे चित्रपट==

१४:०५, २८ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

दत्ता केशव (पूर्ण नाव - दत्ता केशव कुलकर्णी) (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : १८ जानेवारी २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नावाजलेले नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते.

गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे निव्वळ पोटापाण्यासाठी चित्रपटांच्या मायावी दुनियेत सन १९६४ साली आले आणि ४२ वर्षे टिकले. ते आले त्यावेळी अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे यांच्यासारखे नामवंत दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असताना दत्ता केशव यांनी स्वत:ची वाट शोधली आणि नवी ओळख निर्माण केली.

कौटुंबिक चित्रपट ही दत्ता केशव यांची खासियत होती. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता.

दत्ता केशव यांचे चित्रपट

  • अति शहाणा त्याचा...(दिग्दर्शन)
  • असेल माझा हरी...(दिग्दर्शन)
  • ओवाळिते भाऊराया (दिग्दर्शन)
  • कशाला उद्याची बात (दिग्दर्शन)
  • जन्मकुंडली (दिग्दर्शन)
  • जिद्द (दिग्दर्शन)
  • तुमचं आमचं जमलं (दादा कोंडके यांचा चित्रपट, दत्ता केशव यांची पटकथा)
  • दे टाळी (दिग्दर्शन)
  • धमाल बाबल्या गणप्याची (दिग्दर्शन)
  • नवरा माझा ब्रह्मचारी (दिग्दर्शन)
  • पोरींची धमाल बापाची कमाल (दिग्दर्शन, पटकथालेखन, संवादलेखन)
  • प्रेमासाठी वाट्टेल ते (दिग्दर्शन)
  • फटाकडी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • बाई मोठी भाग्याची (दिग्दर्शन)
  • बायांनो नवरे सांभाळा (दिग्दर्शन)
  • भिंगरी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • मला देव भेटला (दिग्दर्शन)
  • मीच तुझी प्रिया (दिग्दर्शन)
  • मोसंबी नारंगी (सुषमा शिरोमणी यांचा चित्रपट, दत्ता केशव यांचे दिग्दर्शन)
  • येडा की खुळा (दिग्दर्शन)
  • येथे शहाणे राहतात (दिग्दर्शन)
  • राणीनं डाव जिंकला (दिग्दर्शन)
  • संत गजानन शेगावीचा (दिग्दर्शन)
  • सावली प्रेमाची (दिग्दर्शन)
  • सौभाग्याचं लेणं (दिग्दर्शन)

..यादी अपूर्ण.

आत्मचरित्र

  • 'अपूर्णविराम' नावाचे आत्मचरित्र

दत्ता केशव यांना मिळालेले पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२००१)
  • या शिवाय दहाहून अधिक पुरस्कार