"भा.ल. महाबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: भा.ल. महाबळ (जन्म : इ..स. १९३२)हे मराठीत विनोदी अंगाने जाणारे हलकेफुल... |
(काही फरक नाही)
|
२३:१३, १३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
भा.ल. महाबळ (जन्म : इ..स. १९३२)हे मराठीत विनोदी अंगाने जाणारे हलकेफुलके लिखाण करणारे लेखक आहेत. त्यांची २०१९ सालापर्यंत सत्तर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रांतून त्यांचे सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात. मुंबईच्या माटुंगा परिसरातील 'व्हीजेटीआय’या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते वयाच्या ६०व्या वर्षी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.
१९४९ ते १९५८ या काळात म्हणजे महाबळ सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजच्या आणि नंतर सांगलीच्याच वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो. त्यांनी विलिंग्डन कॉलेजातून मी बी.एस्सी (ऑनर्स) ही पदवी घेतली, दोन शाळांत शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर मिरजेच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग) ही पदवी मिळवली. विद्यार्थी असताना त्यांनी, अमृत, आलमगीर, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, तारका, रंजन, वाङ्मयशोभा, विविधवृत्त, सकाळ, संजय, सह्याद्री, स्वराज्य, हंस-मोहिनी-नवल, या नियतकालिकातून कथा, लेख, कविता लिहिल्या.
१९६२ ला, महाबळांनी मिरज सोडले आणि ते ‘व्हीजेटीआय’मध्ये नोकरी करू लागले. सर्ववेळ नोकरीतच जात असल्याने भा.लं.चे लेखन बंद पडले आणि पुढे, निवृत्तीनंतर वयाच्या साठीनंतर परत सुरू झाले. त्यांचे पहिले पुस्तक 'अस्सा नवरा' हे शंकर सारडा यांच्यामुळे प्रसिद्ध झाले. (या शंकर सारडांचे पहिले पुस्तक वि.कृ. श्रोत्रिय यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकाशित झाले!) भा.ल. महाबळांच्या पहिल्याच पुस्तकाला
(अपूर्ण)