"काॅफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काॅफी हे एक चहासाखेच पेय आहे. बहुसंख्य दक्षिणी भारतीय लोक चहाऐवज...
(काही फरक नाही)

१०:००, ५ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

काॅफी हे एक चहासाखेच पेय आहे. बहुसंख्य दक्षिणी भारतीय लोक चहाऐवजी काॅफी पितात. महाराष्ट्रात दूध-साखर घालून उकळलेली गोड सौम्य काॅफी पितात. (संगीत, नाटक, हळदीकुंकू यासारख्या प्रसंगी जायफळ-वेलदोडा घातलेली काॅफी असते.) दक्षिण भारतीय 'स्ट्राँग' 'फिल्टर" काॅफी पितात.

देश-विदेशांत काॅफीचे काही खास प्रकार पिले जातात. ते असे :-

  • एस्प्रेसो काॅफी : हिच्यासाठी बारीक पूड केलेली भाजलेली काॅफी वापरतात. एस्पेसो काॅफी बनवताना काॅफी पूड मेटल फिल्टरमध्ये 'पॅक' करून तिच्यावर खूप दाबाने अतिगरम पाणी घालतात. या दाबामुळे काॅफी जास्तच 'स्ट्राँग' होते. एस्प्रेसो काॅफीत दूध नसते.
  • मोका : कोणत्याही प्रकारच्या एस्प्रेसो काॅफीमध्ये दूॄध आणि हाॅट चाॅकलेट (काही ठिकाणी चाॅकोलेट सिरप) मिसळले की मोका बनतॆे.
  • कॅपॅचिनो : एस्प्रेसो काॅफी, वाफाळलेले दूध आणि फेसाळते दूध घालून ही काॅफी बनते. यासाठी एस्प्रेसो मशीनवर एका हाय प्रेशर पाईपमधून दुधावर गरम वाफ मारून त्याला उकळी आणतात. ह्याच पाईपने फेसाळ दूधही बनते.
  • लातो : एस्प्रेसो काॅफीत वाफाळलेले दूध घालून ही काॅफी तयार होते. कॅपॅचिनोतल्या फेसाळ दुधाविपरीत या काॅफीत फेसाळ दुधाचा फक्त एक पातळ थर असतो.
  • अमेरिकानो : ही जवळजवळ एस्प्रेसोसारखी असते. पण हिच्यात आवडीनुसार कमी जास्त पाणी घालून ही पातळ केलेली असते.