Jump to content

"रामसे बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्याम रामसे (जन्म : इ.स. १९५२; मृत्यू : १८ सप्टेंबर २०१९) आणि आणि तुलस...
(काही फरक नाही)

२०:४९, १८ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

श्याम रामसे (जन्म : इ.स. १९५२; मृत्यू : १८ सप्टेंबर २०१९) आणि आणि तुलसी रामसे हे दोघेही बंधू हिंदी भयपट बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. फतेहचंद .यू. रामसे हे त्यांचे वडील त्यांची कराची आणि लाहोरमध्ये इलेक्ट्राॅनिक्सची दुकाने होती. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर ते आपल्या सात मुलांसह मुंबईत आले आणि त्यांनी लॅमिंग्टन रोडवर एक इलेक्ट्राॅनिक्सचे दुकान काढले.

श्याम रामसे यांनी १९७०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमा आणला. त्यांनी अंधेरा (१९७५), कोई है (२०१७), दरवाजा, दो गज जमीन के नीचे (१९७१), पुराना मंदिर (१९८४), पुरानी हवेली (१९८०), बंद दरवाजा, वीराना, सबूत (१९८०) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी एकूण ३० भयपट निर्माण केले.

श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी रामसे यांच्यासोबतीने भारतीय दूरचित्र वाहिन्यांवर हॉरर शैलीच्या मालिका आणल्या. १९९३ ते २००१ पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली.


हिंदी चित्रपट दिग्दर्शक