"नितीश भारद्वाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नितीश भारद्वाज (जन्म २ जून १९६३) हे दूरचित्रवाणीवरील बी.आर. चोपरा... |
(काही फरक नाही)
|
२२:१६, १ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
नितीश भारद्वाज (जन्म २ जून १९६३) हे दूरचित्रवाणीवरील बी.आर. चोपरांच्या महभारत या मालिकेतल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे रातोरात विख्यात झाले.
मुंबईच्या व्हेटरनरी काॅलेजातील शिक्षण पूर्ण करून नितीश मराठी नाटकांत अभिनय करू लागले. होते. बीआर चोपरांची महाभारत ही मालिका सुरू झाली होती तरी कृष्णाची भूमिका कोण करणार हे नक्की झाले नव्हते. निर्माते कुणा वेगळ्याच अभिनेत्याला घेऊन आले होते. परंतु लेखक राही मासूम रझा, लेकिन कॉन्सेप्चुअल ॲडवायझर पंडित नरेंद्र शर्मा आणि चोपडांना 'तो' कृष्ण पसंत पडला नाही. तेव्हा नरेंद्र शर्मांना नितीश भारद्वाज आठवला. त्यांनी नितीशला आपल्या घरी बोलावले आणि 'कृष्णाासंबंधी तुला काय काय माहिती आहे सांग' म्हटले. नितीशने सांगायला सुरुवात केली आणि तीन तास झाले, तरी सांगणे संपले नव्हते. नरेंद्र शर्मानी श्रीकृष्णाची भूमिका नितीश भारद्वाजनेच करायची असे ठरवून टाकले. शेवटी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर नितीश भारद्वाज आला आणि हा श्रीकृष्ण लोकांच्या डोळ्यात भरला.
त्यानंतर अनेक कृ्ष्ण आले आणि गेले, पण लोकांच्या मनात नितीश भारद्वाज म्हणजे श्रीकृष्ण हे कायम राहिले.
काही किस्से
जयपूरला 'महाभारता'चे शूटिंग चालू असताना, त्यादिवशी काही काम नव्हते म्हणून नितीश तंबूत बसून आराम करीत होते. तेथील गावकरी धरणे धरून बसले होते की जोपर्यंतत कृष्णाचे दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही शूटिंग होऊ देणार नाही. शेवटी कॅमेरामन धर्म चोपरा आले आणि नितीशला गाडीमध्ये बसवून गावात घेऊन गेले. इतकी प्रसिद्धी नितीशला टी.व्हीवरच्या पहिल्याच भूमिकेत मिळाली.
(अपूर्ण)