Jump to content

"फातिमा बेगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: फातिमा बेगम ही हिंदीतली पहिली चित्रपट दिग्दर्शक होती. फातमा बेग...
(काही फरक नाही)

१५:२२, २८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

फातिमा बेगम ही हिंदीतली पहिली चित्रपट दिग्दर्शक होती.

फातमा बेगम हिने सन १९२४मध्ये सीता सरदावा, पृथ्वी बल्लभ, काला नाग, आणि गुलबकावली या चित्रपटांत व नंतर १९२५मध्ये मुंबई नी मोहिनी या चित्रपटात भूमिका केल्या. पुढे ती चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक झाली. फातिमा फिल्म्स या नावाखाली स्थापन केलेल्या तिच्या चित्रपट कंपनीने १९२६ साली बुलबुल-ए-परिस्तान नावाचा चित्रपट बनवला. त्या चित्रपटासाठी फातिमाने, जी फक्त परदेशातच उपलब्ध होती अशी काही तंत्रे वापरली. चित्रपटात ट्रिकसीन्स आणि स्पेशल इफेकक्ट्सही होते.

फातिमा फिल्मचे नाव पुढे व्हिक्टोरिया फातिमा फिल्म्स झाले.

तिने दिग्दर्शित व निर्माण केलेल्या चित्रपटासाठी फातिमाने इतका खर्च केला होता की, त्यावेळपासून बिग बजेट फिल्म ही कल्पना उदयास आली.