"आशा आपराद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा.डाॅ. आशा दस्तगीर आपराद (मृत्यू : २३ ऑगस्ट २०१९) या कोल्हापूृर... |
(काही फरक नाही)
|
१६:२२, २४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
प्रा.डाॅ. आशा दस्तगीर आपराद (मृत्यू : २३ ऑगस्ट २०१९) या कोल्हापूृर येथे राहणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि लेखिका होत्या. त्या हिंदी भाषेच्या प्राध्यापिका होत्या. मुस्लिम समाज आणि मुस्लिम महिला यांच्या प्रश्नांवर त्यांनी बरेच लिखाण केले आहे. कोल्हापूर विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी काम केले. शेवटच्या काळात महिला दक्षता समितीवर त्या काम करत होत्या.
आशा आपराद यांचे 'भोगले जे दु:ख त्याला...' हे आत्मचरित्र विशेष गाजले. 'दर्द जो सहा मैंने...' या नावाने या आत्मकथनाचे हिंदी भाषांतर झाले आहे.
आशा आपराद यांना मिळालेले पुरस्कार
- भैरुरतन दमानी पुरस्कार
- महाराष्ट्र शासन उत्कृष्ट मराठी वाडमय राज्य पुरस्कार
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचा पुरस्कार