"अल बरूनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: भारतीय विद्यांचा अद्भुत जाणकार असलेला अल बरूनी हा गझनीच्या मह... |
(काही फरक नाही)
|
१७:५३, ६ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
भारतीय विद्यांचा अद्भुत जाणकार असलेला अल बरूनी हा गझनीच्या महंमदाबरोबर भारतात आलेला त्याचा एक कैदी होता. तो मुळात मध्य आशियातील खीवा साम्राज्यामध्ये (आजच्या उझबेकिस्तानचा एक भाग) एक मंत्री होता. जेव्हा इसवी सन १०१७मध्ये खीवाच्या बादशहाला महंमदाने पराजित करून बादशहाबरोबरच अल बरूनीला कैद केले, तेव्हा त्यांने या दोघांसह अनेकांना भारतात आणले होते.
अल बरूनी सुरुवातीपासूनच हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करीत होता. भारतात आणल्यावरही त्याचा हा अभ्यास चालूच राहिला. एका बाजूला गझनीचा महंमद हिंदू संस्कृती नष्ट करीत चालला होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यात सैन्याबरोबर असलेला अल बरूनी हा हिंदू संस्कृत-हिंदू साहित्याचे अध्ययन-मनन करीत होता. अध्ययनाबरोबरच त्याचे संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर करण्याचे उद्योग चालू होते.
अल बरूनीची मुख्य अडचण ही होती के तो भारतात हव्या त्या ठिकाणी हिंडून साहित्य गोळा शकत नव्हता की विद्वानांना भेटू शकत होता. फक्त गझनीच्या राज्यात (हे इराणपासून ते अफगाणिस्तान-पाकिस्तान पर्यंत होते) आणि भारतातील पंजाबमध्ये भ्रमण करणे अल बरूनीला जमू शकत होताॆ. पण त्याच्या सुदैवाने गझनीच्या साम्राज्यात बरेच हिंदू होते. त्यांच्याबरोबर चर्चांमधून त्याने भारताला येण्यापूर्वीच ब्रह्मसिद्धान्त, खंडखाद्यक, पंचतंत्र, चरक संहिता ह्या ग्रंथांची माहिती मिळवून त्यांचे अनुवाद करून तो मोकळा झाला होता.
(अपूर्ण)