Jump to content

"परशुराम गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: परशुरामतात्या गोडबोले, परशुरामपंत गोडबोले, पंततात्या गोडबोले (ज...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:


याशिवाय, परशुरामपंत गोडबोले यांनी कादंबरीसार, नामार्थदीपिका, पाठावली, बालबोधामृत, मराठ्यांच्या इतिहासावर सोप्या कविता, वृत्तदर्पण, इत्यादि पुस्तकेही लिहिली आहेत.
याशिवाय, परशुरामपंत गोडबोले यांनी कादंबरीसार, नामार्थदीपिका, पाठावली, बालबोधामृत, मराठ्यांच्या इतिहासावर सोप्या कविता, वृत्तदर्पण, इत्यादि पुस्तकेही लिहिली आहेत.

{{DEFAULTSORT:गोडबोले,परशुरामपंत नारायण}}

[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १७९९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८७४ मधील मृत्यू]]

१५:२२, ५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

परशुरामतात्या गोडबोले, परशुरामपंत गोडबोले, पंततात्या गोडबोले (जन्म वाई, इ.स. १७९९; मृत्यू : पुणे, इ.स. १८७४) या विविध नावांनी प्रसिद्ध असलेले परशुराम नारायण गोडबोले हे संस्कृत पंडित व मराठी लेखक होते. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गोळप हे त्यांचे रहाण्याचे मूळ गाव. त्यांचे शिक्षण वाईला झाले. त्यानंतर ते पुण्याला आले व जोगांच्या पेढीवर कारकून म्हणून काम करू लागले. हे काम करीत असतानाच परशुरामपंत मराठी काव्यांचा भाषादृष्ट्या अभ्यास करीत. तेथेच त्यांचा परिचय कॅप्टन थाॅमस कँडी यांच्याशी झाला. इ. स. १८५५ सालीं जेव्हां कँडीला मराठी ट्रान्सलेटरचे पद मिळाले तेव्हा त्याने परशुरामतात्यांची नेमणूक आपला खास पंडित म्हणून केली. ह्या जागेवर तात्या अखरेपर्यंत होते.

माधव चंद्रोबांना त्यांचे 'सर्वसंग्रह' नावाचे संपादित ग्रंथ लिहिण्यास परशुराम गोडबोले यांची मदत होत असे.

परशुरामपंत गोडबोले यांची पुस्तके

  • उत्तररामचित (अनुवादित नाटक, मूळ संस्कृत लेखक : भवभूती)
  • केकादर्श (दादोबा पांडुरंग तर्खडकरांच्या 'यशोदा पांडुरंगी'चे सुलभीकरण)
  • तुकारामाची गाथा (संपादित, मुख्य संपादक : शंकर पांडुरंग पंडित)
  • नवनीत भाग १ व २ : मराठी संत-पंत-तंत कवींच्या काव्यांची उद्धरणे)
  • नागानंद (अनुवादितनाटक , मूळ संस्कृत लेखक : हर्ष)
  • पार्वतीपरिणय (अनुवादित नाटक, मूळ संस्कृत, लेखक बाणभट्ट किंवा वामन भट्टबाण)
  • मृच्छकटिक (अनुवादितनाटक, मूळ संस्कृत लेखक शूद्रक)
  • वेणीसंहार (अनुवादित, मूळ भट्टनारायणाचे संस्कृत नाटक)
  • शाकुंतल (अनुवादित, मूळ कालिदासाचे संस्कृत नाटक अभिज्ञानशाकुन्तलम्)

याशिवाय, परशुरामपंत गोडबोले यांनी कादंबरीसार, नामार्थदीपिका, पाठावली, बालबोधामृत, मराठ्यांच्या इतिहासावर सोप्या कविता, वृत्तदर्पण, इत्यादि पुस्तकेही लिहिली आहेत.