Jump to content

"कांचीपुरम सिल्क साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कांजीवरम साडी ही भारतातच्या तमिळनाडू प्रांतातील कांजीपुरम येथ...
(काही फरक नाही)

१४:४२, २१ जुलै २०१९ ची आवृत्ती

कांजीवरम साडी ही भारतातच्या तमिळनाडू प्रांतातील कांजीपुरम येथील विणकर विणतात.

कांजीवरम साडीचे वैशिष्ट्य म्हणजे रुंद आणि साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट करणाऱ्या रंगांचे काठ. या साडीची किंमत २५०० पासून सहा लाख रुपयांपर्यंत असते. पर्यंत असते. साडीमधले सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, साडी विणण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरलेले रेशीम, खरी जर इत्यादी घटकांनुसार साडीची किंमत ठरते. या कांचीपुरम साडीला २००५ सालापासून ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे.

कांजीवरम साडी साडी विणायला नेहमी तीन विणकर लागतात. या साडीच्या काठाचे नक्षीकाम आणि रंग हे त्या साडीच्या मध्य भागातील रंगापेक्षा पूर्णत: वेगळे असते. साडीचा पदर अगदी भिन्न रंगाने आणि स्वतंत्रपणे विणला जातो. पदर विणून झाल्यावर तो अतिशय नाजूकपणाने साडीला जोडला जातो. मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते. या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स (चौकडे), पट्टे आणि बुट्टे विणलेले असतात. ही साडी विणताना अतितलम रेशमाचा व बहुधा खऱ्या जरीचाच वापर केला जातो.

कांजीवरम साडीच्या नक्षीकामात सूर्य, चंद्र, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नाणी, आंबे, पाने, जाई-जुईच्या कळ्या अशा प्रकारच्या आकारांचा समावेश असतो. . या साडीचा वापर प्राधान्याने लग्नासारख्या मोठ्या सणां-समारंभांत होतो.

==कांजीवरम साड्यांचे काही प्रकार :-

  • वल्ली मुहूर्तम साडी : ही जाडी पूर्णपणे ब्रोकेड व जरीची असते. साडी सोनेरी रंगाची असून आणि सोन्याच्या धाग्यांनी विणली जाते. कांजीवरम साडीच्या या प्रकाराचे वैशिष्ट्य असे की हिच्यावर कोणत्याही रंगाचे पोलके शोभून दिसते. साडीची किंमत ५०,००० रुपये ते सहा लाख रुपये. हिंदी अभिनेत्री रेखा नेहमी नेसते म्हणून या 'वल्ली मुहूर्तम' साडीला रेखा साडी म्हणूनही ओळखतात,
  • अंबरनाथ साडी : कांजीवरम साडीच्या या प्रकाराला काठ नसतात. साडीचा पदर आणि साडी एकसमान नसतात. किंमत १५,००० ते ३०,००० रुपये.
  • कट्टम आणि वरी : कट्टम म्हणजे चौकडी आणि वरी म्हणजे धागे. या प्रकारच्या कांजीवरम साडीत चौकड्यांच्या सरहद्दीवर जरीचे धागे असतात. काही चौकड्यांत जरीचे बुट्टेही असतात. किंमत ३० ते ५५ हजार रुपये.
  • अहेरी : या शुद्ध रेशमी धाग्यांपासून बनलेल्या कांजीवरम साडीवर अस्सल सोन्याची जर असते. किंमत २० ते ५० हजार रुपये.
  • मोल्टन : ही कांजीवरम साडी फक्त पेस्टल आणि सोनेरी रंगाची असते. किंमत १५ ते ६० हजार रुपये.