"अनुराधा औरंगाबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. अनुराधा औरंगाबादकर या पाकक्रियांवर पुस्तके लिहिणाऱ्या नाम... |
(काही फरक नाही)
|
२३:०४, १३ जून २०१९ ची आवृत्ती
डाॅ. अनुराधा औरंगाबादकर या पाकक्रियांवर पुस्तके लिहिणाऱ्या नामवंत कलावंतांच्या चरित्रलेखिका आहेत. हंस-मोहिणी-नवल मासिकांचे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर हे त्यांचे वडील. आपल्या वडिलांवर त्यांनी 'अंतरकर एक चिकित्सक अभ्यास : लेखक व हंस, मोहिनी, नवलची वाङ्मयीन कामगिरी' नावाचा पीएच.डीचा प्रबंध लिहिला आहे.
अनुराधा औरंगाबादकर या नाशिकच्या 'गावकरी' दैनिकात काम करीत असत.
अनुराधा औरंगाबादकर यांनी लिहिलेली पुस्तके
- उपवासाचा फराळ
- ५१ सूपचे प्रकार
- कचोरीचे ६५ खमंग प्रकार
- करुणासागर (डाॅ. ह.वि. सरदेसाई -व्यक्ती आणि विचार)
- कल्पवृक्ष कन्येसाठी (अनंत अंतरकरांचे व्यक्तिचित्रण)
- किशोरवयीन मुलांसाठी गोष्टी (बालसाहित्य)
- कैरीचा हंगामा
- घरच्या घरी करा दिवाळीचा फराळ
- दुधी भोपळ्याचे २०१ प्रकार
- सदाबहार देव आनंद
- नाट्यप्रेमी कमलाकर सारंग
- भाताचे २१० प्रकार
- मला दिसलेला आदिवासींचा आदित्य (प्रा. डाॅ. गणेश देवी यांचे व्यक्तिचित्रण)
- श्री महालक्ष्मीचा नैवेद्य
- मुखवट्याआडचे चेहेरे (व्यक्तिचित्रणे)
- लाडूच लाडू
- लुकलुकणारे विचार दिवे (ललित)
- विचारधन (वैचारिक)
- सर्वांसाठी आवडती मधली वेळ (दुपारचे खाणे)
- सिनेमातली माणसं
- हसरा सूर्य (कादंबरी)