"माधवी कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: माधवी कुंटे या एक मराठी लेखिका व अनुवादक आहेत. वेद राही यांच्या... |
(काही फरक नाही)
|
२३:४५, ३१ मे २०१९ ची आवृत्ती
माधवी कुंटे या एक मराठी लेखिका व अनुवादक आहेत. वेद राही यांच्या उत्तमोत्तम हिंदी पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत.
माधवी कुंटे यांची पुस्तके
- अथांग (कादंबरी)
- अधुरी एक कहाणी (अनुवादित; मूळ लेखक - वेद राही)
- अनंत (अनुवादित, मूळ हिंदी लेखक वेद राही) : जम्मूमधील २००८ साली झालेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी)
- ओशो कथामंजिरी (अनुवादित)
- गप्पांगण (वैचारिक)
- जिची तिची कथा (स्त्रीविषयक कथांचा संपादित संग्रह (सहसंपादिका डाॅ. चारुशीला ओक)
- जीवनमूल्य (ललित लेख)
- तेजोमय (व्यक्तिचित्रणे)
- निवडक माधवी कुंटे (कथासंग्रह)
- प्रकाशफुले (ललित लेख)
- प्रेमसूत्र (कादंबरी)
- मर्मबंध (कादंबरी)
- महाद्वार उघडताना (कथासंग्रह)
- माझा आनंद माझ्या हाती (व्यक्तिमत्त्वविकास विषयक)
- मारिया (कादंबरी)
- ललद्यद (एका काश्मिरी कवयित्रीचे अनुवादित चरित्र; मूळ लेखक - वेद राही)
- सकारात्मक जीवनदृष्टी (व्यक्तिमत्त्वविकास विषयक)
- सय (कादंबरी)
- सहप्रवासिनी (कादंबरी)
- सुदृढ मानसिकतेसाठी (मानसशास्त्रावरील पुस्तक)
- स्त्रीसूक्त (सामाजिक)
- हिरवी पालवी (वैचारिक)
- हिंसा ते दहशतवाद (वैचारिक)
माधवी कुंटे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (वर्ष माहीत नाही)
- मुंबईतल्या दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे १३ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या वेळी माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
{{वर्ग:मराठी लेखिका]]