"सप्तलिंगी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सप्तलिंगी नदी ही रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातली नदी आहे.... |
(काही फरक नाही)
|
१२:४६, २७ मे २०१९ ची आवृत्ती
सप्तलिंगी नदी ही रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातली नदी आहे.
संगमेश्वरापासून ३२ किलोमीटर अंतरावर एका लहान तोंडाच्या लहानश्या गुहेत मार्लेश्वर नावाचे एक शंकराचं मंदिर आहे. या काळोखी गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या निरांजनाचा मंद उजेड सोडला तर गुहेत प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गुहेत शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराजवळ एक धबधबा आहे. तेथे जवळजवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठूनकुठून पर्यटक येतात. दगडांतून, हिरवाईतून वाट काढत पुढे वाहत जाणाऱ्या या पाण्याचे रूपांतर सप्तलिंगी नदीत होते. ही नदी खळखळाट करीत वाहते.
मंदिराच्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत.त. आजूबाजूचं सौंदर्य मात्र तेच आहे. जाण्याची वाट केवळ सुकर झालीय. पाय-याही रूंद आणि जवळजवळ आहेत. त्यामुळे चालण्याचं काहीच जाणवत नाही. वयस्क व्यक्तींना किंवा मुलांना घेऊन जाण्यासाठीही हे ठिकाण उत्तम. एका तासात शंकराचं दर्शन घेऊन आणि धबधब्याचा आनंद घेऊन परतता येतं. पाण्यात खेळायची इच्छा अनावर झाल्यानं कुणी रेंगाळलं तर मात्र कितीही तास कमीच पडतील. गुहेसमोर थोडी जागा आहे. तिथे उभं राहून धबधब्याचं सौंदर्य निरखत किंवा शांत वातावरणात त्याचा आवाज ऐकण्याचाही अनुभव अपूर्व असतो. अगदीच एकटं वाटलं तर सोबत करण्यासाठी माकडं असतात. गुहेच्या आसपास त्यांचा वावर असतो. पण त्याचा आपल्याला त्रास होत नाही.
मार्लेश्वरला जाण्यासाठी १६ किलोमीटरवर असलेल्या देवरूख गावापासून बस आहे.