Jump to content

"मधुकर क्षीरसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. मधुकर क्षीरसागर हे एक मराठी लेखक आहेत. ते पाटोदा येथील पद्...
(काही फरक नाही)

२१:०२, २७ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रा. मधुकर क्षीरसागर हे एक मराठी लेखक आहेत. ते पाटोदा येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील (पीव्हीपी) महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक व विषयप्रमुख आहेत. त्यांची पी.एच.डी. ‘दिंडी’ या विषयावर आहे. कांदबरी, कविता, कथा, गीत , एकांकिका, ओवी, आरती अशा विविध लेखन प्रकारांत त्यांनी लिखाण केले आहे.

प्रा.डॉ. क्षीरसागर यांनी व्यसनमुक्ती विषयासाठी मोठ्या प्रमाणात लिहिले आहे. त्यांची गीते आणि अन्य लेखन ओवीबद्ध स्वरूपात नाट्यमयरीत्या सादर होते. त्या लेखनासाठी त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

प्रा. मधुकर क्षीरसागर यांची पुस्तके

  • इंद्रधनू (आ.य. पवारांच्या 'ऊनपाऊस' या कवितेवर नामवंत समीक्षकांनी लिहिलेल्या समीक्षा लेखांचे संकलन व संपादन) -सहसंपादक -डाॅ. विजया राऊत)
  • घोषवाक्य स्वरूप आणि प्रयोजन
  • स्वांग (ग्रामीण कथासंग्रह)

मधुकर क्षीरसागर यांना मिळालेले पुरस्कार

  • आदर्श प्राध्यापक पुरस्कार (२०१७)
  • कुसुमताई अविळे सेवा संस्थेचे प्रशस्तिपत्र (२०१७)
  • महाराष्ट्र नाॅलेज काॅर्पोरेशन (MKCL)चे सन्मानपत्र
  • महाराष्ट्र सरकारचा काव्यलेखन पुरस्कार (२०१३)
  • महाराष्ट्र सरकारचा नानासाहेब वरणगांवकर स्मृति पुरस्कार (२०१२)
  • महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार (२०१६)
  • महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार (२०१३)
  • मराठी साहित्य प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार, जामखेड (२०१८)
  • रोटरी भूषण पुरस्कार (२०१७)