"कुमुदिनी रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: कुमुदिनी रांगणेकर (जन्म : २५ मार्च १९०६; मृत्यू : ) या एक मराठी कादंब... |
(काही फरक नाही)
|
११:५८, २५ मार्च २०१९ ची आवृत्ती
कुमुदिनी रांगणेकर (जन्म : २५ मार्च १९०६; मृत्यू : ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथाकार लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स अॅन्ड बून्स' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत.
रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत. श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या २० कादंबऱ्या छापल्या.
कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके
- अंतरीची ओढ (कादंबरी)
- अतर्क्य गूढ (कादंबरी)
- अपूर्व साहित्य (बालसाहित्य)
- इच्छामणी (कादंबरी)
- खुपणारा सुखा (कादंबरी)
- गोड बंधन (कथासंग्रह)
- छोट्यांची मोठी साहसे भाग १, २ (बालसाहित्य)
- जिथे तीन फाटे फुटतात (अनुवादित, मूळ एथेल एम डेल् यांची 'व्हेअर थ्री रोड्स मीट')
- ढगाळलेले आकाश (कादंबरी)
- नसत्या उठाठेवी (कादंबरी)
- नाजुक ठेव (कादंबरी)
- निद्रिस्त खून (कादंबरी)
- पत्त्यातली राणी (कादंबरी)
- परतदान (कादंबरी)
- प्रेमाचा हुकमी त्रिकोण (कादंबरी)
- बच्चू लक्ष्मण (कादंबरी)
- बाहुली पडली आजारी (कथासंग्रह)
- मख्मली वल्ली (बालकुमारांसाठी कादंबरी)
- लांडा कारभार (कादंबरी)
- शब्दांच्या पलिकडले (कादंबरी)
- संशयित (कादंबरी)
- स्वप्नाळू प्रीत (कादंबरी)
- हुकमी एक्का (कथासणग्रह)