"यशवंत पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे सं...
(काही फरक नाही)

१५:२७, २३ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रा.डॉ. यशवंत पाठक (जन्म : सन १९४६; निधन : नाशिक, २३ मार्च २०१९) हे संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक होते. ते मराठी व संस्कृतमध्ये एम.ए. असून त्यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठातून १९७८मध्ये पीएच्‌.ड़ी. मिळवली होती. त्यांच्या प्रबंधाचे नाव 'नाचू कीर्तनाचे रंगी' असे होते.

यशवंत पाठक हे मनमाडच्या येथे महात्मा गांधी विद्यामंदिराच्या महाविद्यालयात ३५ वर्षे प्राध्यापक होते.

डाॅ.यशवंत पाठक यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणातले आभाळ (आत्मकथन)
  • आनंदाचे आवार (लेखसंग्रह)
  • कीर्तन प्रयोग (चर्चासत्रांमध्ये सादर झालेले विविध कीर्तनप्रकारांवरचे निबंध)
  • चंदनाची पाखर (कथासंग्रह)
  • चंद्राचा एकांत (ललित लेख)
  • निरंजनाचे माहेर
  • पहाटसरी (ज्ञानेश्वरीवर आधरित विवेचने)
  • ब्रह्मगिरीची सावली (कादंबरी)
  • मोहर मैत्रीचा (ललित लेखसंग्रह)
  • येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ
  • संचिताची कोजागिरी (कादंबरी)

प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार

  • चतुरंग पुरस्कार
  • डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
  • संत विष्णुदास कवी पुरस्कार
  • संत ज्ञानदेव पुरस्कार