"घबाड मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सू्र्यनक्षत्रापासून दिवसाच्या चंद्रनक्षत्रापर्यंत आकडे मोजत... |
(काही फरक नाही)
|
१८:५०, १९ मार्च २०१९ ची आवृत्ती
सू्र्यनक्षत्रापासून दिवसाच्या चंद्रनक्षत्रापर्यंत आकडे मोजतात. उत्तराची तिप्पट करून येणाऱ्या अंकात त्या दिवशीची तिथी मिळवतात. बेरजेला ९ने भागून बाकी ३ आली तर घबाड मुहूर्त आहे असे समजतात. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास सुरुवात झाली तर ते कार्य सफल होऊन मोठा लाभ होतो असे सांगितले जाते.
पंचागात घबाड मुहूर्त दिलेले असतात.
अन्य मुहूर्त
अभिजित मुहूर्त, गोरज मुहूर्त, चौघडिया मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त, साडेतीन मुहूर्त, वगैरे,
विवाहासाठीचे मुहूर्त
विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत--
१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त
२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत
३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत
४) गोरज मुहूर्त -- सूर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( संध्यासमयी )
ग्रंथ
मुहूर्त शास्त्रावर धर्मसिंधु, निर्णयसिंधु, मुहूर्तगणपति, मुहूर्त चिंतामणि, मुहूर्त पारिजात, मुहूर्त मार्तण्ड, मुहूर्त प्रकरण आदी ग्रंथ आहेत. पैकी महाराष्ट्रात 'मुहूर्त चिंतामणि' विशेष प्रसिद्ध आहे.