"यशवंत भालकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: यशवंत भालकर (निधन - १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक... |
(काही फरक नाही)
|
१२:०४, १९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
यशवंत भालकर (निधन - १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिगदर्शनही केले होते.
कोल्हापूरचे राहणारे असल्याने त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला.
शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने दिलेल्या स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता.
रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली.
यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट (एकूण १३हून अधिक)
- घे भरारी
- नाथा पुरे आता (२००६)
- पैज लग्नाची
- राजमाता जिजाऊ (२०११)
- लेक लाडकी (२०१३)
- हाय कमांड
यशवंत भालकर यांनी लिहिलेली पुस्तके
- पडद्यामागचा सिनेमा
- मला भेटलेली मोठी माणसं
- लामणदिवा
पुरस्कार
- यशवंत भालकर यांच्या 'पैज लग्नाची' या चित्रपटाला १४ राज्य पुरस्कार मिळाले होते
- त्यांच्या 'घे भरारी' या चित्रपटाला ५ व्ही. शांताराम पुरस्कार मिळाले होते.