Jump to content

"हिरदेशाह लोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिरदेशाह लोधी हा मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूर जिल्ह्यातल्या हि...
(काही फरक नाही)

१८:०८, ९ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

हिरदेशाह लोधी हा मध्य प्रदेशातल्या नरसिंहपूर जिल्ह्यातल्या हिरापूरचा राजा होता. सन १८५७ पूर्वी हिरापूर हे स्वतंत्र राज्य होते. हिरदेशाहने 'महाकोशल'च्या बुंदेलखंड भागात संघटन उभारून इंग्रजांशी १८४२ सालापासून संघर्ष सुरू केला. १८५७च्या युद्धात हिरदेशाह मारला गेला. त्याची सर्व संपत्ती जप्त करून इंग्रजांनी त्याच्या किल्ल्याला आग लावली. हिरदेशाह हे असे राजे होते, की ज्यांनी इंग्रजांपासून मुक्ती मिळवण्यासाठी राजसिंहासनाचा आणि कुटुंबीयांचा त्याग करून जंगल-जंगल भटकणे पसंत केले. जंगलांतून हिंडून ते इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मोठी फौज तयार करण्याच्या प्रयत्नांत असत. त्यांच्या बंडामुळे ब्रिटिश सैन्याधिकारी कॅप्टन विल्यम स्लीमन आणि वाॅटसन त्रस्त झाले होते. स्लीमनने गव्हर्नरला पत्र लिहून हिरदेशाहला त्याचे राज्य परत करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हिरदेशाह यांच्या संघर्षाची धार कमी झाली, आणि त्यातच त्यांचा घात झाला.

ब्रिटिश राजवटीत या राज्याला हिरागड संस्थान म्हणत.

हिरदेशाह लोधीच्या आयुष्यावर वसीम खान नावाच्या नाटककाराने 'हीरापुर का हीरा हिरदेशाह' नावाचे नाटक लिहिले आहे.

संदर्भ

  • हीरापुर के हिरदेशाह (पुस्तक, मध्य्य प्रदेशच्या संस्कृती विभागाचे प्रकाशन)