Jump to content

"शम्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शम्मी (जन्म : २४ एप्रिल १९३०; मृत्यू : ५ मार्च २०१८) या आपल्या सिनेक...
(काही फरक नाही)

२०:२९, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

शम्मी (जन्म : २४ एप्रिल १९३०; मृत्यू : ५ मार्च २०१८) या आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केलेल्या अभिनॆत्री होत्या.

शम्मी यांचे खरे नाव नर्गिस रबाडी होते. गुजराथच्या नारगोल संजान येथे त्यांचा जन्म झाला. पारसी कुटुंबात जन्मलेल्या नर्गिस या काही महिन्यांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरचा संबंध नव्हता. नर्गिस या अगदी योगायोगाने चित्रपटसृष्टीत आल्या.

दिग्दर्शक तारा हरीश यांनी नर्गिसला 'नर्गिस' हे नाव बदलून 'शम्मी' हे नवे नाव धारण करण्याचा सल्ला दिला, कारण नर्गिस नावाची एक अभिनेत्री आधीच चित्रपटसृष्टीत होती. नर्गिसने हा सल्ला ऐकला.

वयाच्या १८ व्या वर्षी शम्मी यांनी 'उस्ताद पेड्रो' हा पहिला चित्रपट केला. यात त्यांनी सहनायिकेची भूमिका साकारली. पुढे 'मल्हार' या चित्रपटात त्यांना मुख्य नायिकेची भूमिका मिळाली. शम्मी यांनी नर्गिस, मधुबाला, दिलीप कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत काम केले होते.

चित्रपटांशिवाय दूरचित्रवाणीवरही शम्मी झळकल्या. 'देख भाई देख' या मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. 'जबान संभाल के', 'फिल्मी चक्की'; या टीव्ही शोमध्येही त्या दिसल्या.