Jump to content

"वासुदेव महादेव अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर (जन्म : इ.स. १८६२; मृत्यू : इ.स. १९४३) ह...
(काही फरक नाही)

१५:०५, ७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर (जन्म : इ.स. १८६२; मृत्यू : इ.स. १९४३) हे पुण्यात राहणारे एक संस्कृत विद्वान व वैयाकरणी होते. त्यांचे शिक्षण सातार्‍यातील प्रसिद्ध विद्वान पंडित राजाराम शास्त्री गोडबोले यांच्या देखरेखीखाली झाले.

वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांची प्रतिभा वेदान्त, मीमांसा, साहित्य, न्याय, ज्योतिष या ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांत झळकली. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांवर टीका लिहिल्या. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित झालेल्या महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापकपदासाठी बोलावले.

वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी लिहिलेली काही पुस्तके

  • अद्वैतामोद
  • कायशुद्धि
  • धर्मतत्व निर्णय
  • ब्रह्मसूत्र शांकर भाष्य आणि पंतजलि महाभाष्य यांचे मराठी अनुवाद
  • सूत्रांतर परिग्रह विचार

वासुदेव शास्त्री अभ्ह्यंकरांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • १९२१ साली महामहोपाध्याय ही उपाधी
  • संकेश्वरच्या शंकराचार्यांकडून ’विद्वद्रत्न' ही मानाची उपाधी.