Jump to content

"भागोजी कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भागोजी बाळू कीर हे मुंबईतील एक उद्योगपती होते. भंडारी समाजाचे ते...
(काही फरक नाही)

१५:४३, ३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

भागोजी बाळू कीर हे मुंबईतील एक उद्योगपती होते. भंडारी समाजाचे ते प्रेरणास्थान होते.

भागोजी कीर यांचा जन्म १८६७ मध्ये अठराविश्वे दारिद्र्यात भागोजी यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. ज्या वयात खेळायचं त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. हे सर्व करताना ते रत्नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहात होते. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळोजी शेतमजूर होते. भागोजीनेफुकट शिख्षण असलेल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळवला.

मुंबईला जाण्यासाठी भागोजींनी एका तांडेलाला मुंबईत बिनपैशात पोहोचवायची विनंती केली. मुंबईत आल्यावर १२ वर्षांच्या भागोजीला एका सुताराने ठेवून घेतले आणि रंधा मारायचे काम दिले. दिवसाला दोन आणे मिळायचे. छोट्या भागोजीला कचर्‍यातही लक्ष्मी दिसली. तो सुताराच्या परवानगीने जाळण्यासाठी लाकडाचा भुसा बाजारात विकायला लागला. त्याला आणखी दोन आणे मिळायला लागले. जमतील तेवढे पैसे भागोजी घरी पाठवू लागला.

त्यानंतर भागोजीला शापूरजी पालनजी या कंपनीतले पालनजी भेटले. हा माणूस मोठमोठ्या इमारती बांधून मुंबईचे रूप बदलत होता. त्यांना भागोजी आवडला; त्यापूर्वी त्यांनी भागोजीची परीक्षा घेतली. लाकडाच्या भुशात पैशाच्या नोटा ठेवल्या. भागोजीला नोटा सापडल्या. तिथल्या तिथे त्याने नोटा परत केल्या. त्याच्यावर शापूरजी प्रसन्न झाले. त्यांनी भागोजीला कॉन्ट्रॅक्ट्स दिली. काही कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्याकडे चालून आली. सोनचाफ्यांची फुले विकून शिक्षण घेणारा रत्नागिरीचा भागोजी मुंबईचा शिल्पकार बनला.

लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग या मुंबईतील सर्व इमारती बांधण्यात भागोजीचा हात आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी काँक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली.