Jump to content

"विज्ञान केंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सामान्य जनता आणि विद्यार्थी यां च्या विज्ञाविषय़ी कुतूहल निर्म...
(काही फरक नाही)

१५:४०, ३० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

सामान्य जनता आणि विद्यार्थी यां च्या विज्ञाविषय़ी कुतूहल निर्माण करणारी महाराष्ट्रात काही विज्ञान केंद्रे आहेत. त्यांच्यापैकी काही ही :-

नेहरू सायन्स सेंटर, वरळी (मुंबई)

सायन्स सेंटर, ठाणे

मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ठाण्यात एक सायन्स सेंटर उभारले गेले आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने (एनसीएसएम) मंजुरी नंतर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. हे सेंटर, ठाणे आणि सभोवतालच्या शहरातील शाळकरी मुलांचे कुतूहल शमविण्याबरोबर त्यांच्या ज्ञानात भर टाकणारे असून ठाणे शहराच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक चळवळीतला महत्त्वाचा टप्पा आहे.

सायन्स सेंटरमध्ये अंतराळ विज्ञान, कम्प्युटर्स आदी विविध विज्ञान शाखांची सखोल माहिती देणाऱ्या दालनांसोबतच ५० बदलत्या प्रदर्शनाची सोय असलेली विज्ञान वाटिका प्रस्तावित आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने नुकताच या केंद्राला हिरवा कंदील दाखवला. अंतराळ विज्ञान, सूर्यमालिका तसेच सौर, अणु, पारंपरिक ऊर्जेचा अभ्यास, पूरविज्ञान, चक्रीवादळ, ओझोनचा ऱ्हास, पृथ्वीचे तापमान, पृथ्वीचे संरक्षण, तसेच संगणक शास्त्राची सखोल माहिती, २५ जणांची आसनक्षमता असलेले तारकामंडळ, ५० बदलत्या प्रदर्शनाचा समावेश असलेली विज्ञान वाटिका, जगभरातील वैज्ञानिक संस्थांची माहिती, भारतीय वैज्ञानिकांचा कार्यपरिचय असा प्रचंड माहितीचा खजिना या सायन्स सेंटरमध्ये असेल. दुसऱ्या टप्प्यात थ्रीडी डोम थिएटर, नोबेल म्युझियम, फिरते विज्ञान प्रदर्शन यांसारख्या योजनाही सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

बाळकुम येथील पिरॅमल इंडस्ट्रीकडून मिळणाऱ्या ३२ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर हे सायन्स सेंटर आहे.

रीजनल सायन्स सेंटर, पिंपरी

महाराष्ट्रात चिंचवड येथे ’ऑटो क्लस्ट”समोर एक रीजनल सायन्स सेंटर आहे. हे सेंटर स्थापन करण्यासाठी एनसीएसएमने काही निकष ठरवून दिले होते. त्यांची पूर्तता करून शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सेंटरसाठी मंजुरी मिळवली. हे सेंटर सध्या चार हेक्टर जागेवर उभे आहे. भविष्यात आणखी १० हेक्टर जागा इथे उपलब्ध होणार आहे.