"मिलिंद गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मिलिंद गाडगीळ (निधन : ऑक्टोबर २००७) हे एक युद्धवार्ताहर होते. ते सं...
(काही फरक नाही)

२२:२६, २२ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मिलिंद गाडगीळ (निधन : ऑक्टोबर २००७) हे एक युद्धवार्ताहर होते. ते संपादक, लेखक, युद्धशास्त्राचे अभ्यासक, अर्थकारणाचे भाष्यकार आणि व्यासंगी पत्रकार होते. लेखक गंगाधर गाडगीळ हे त्यांचे मोठे बंधू.

मिलिंद गाडगीळ यांना मेडिकलला अॅडमिशन मिळाली होती. पण सैन्यदलाच्या आकर्षणापोटी त्यांनी कॉलेज सोडून दिले आणि ते सैन्यात भरती झाले. दुर्दैवाने, एका अपघातामुळे त्यांची सैन्यातली कारकीर्द अल्प ठरली. गाडगीळ यांचा 'वॉर रूम'मधले डावपेच, त्यामागचे राष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणही या सर्वांचा अभ्यास होता. हा अभ्यास मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून वाचकांपर्यंत पोचवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अभ्यासाला अनाठायी 'जडत्व' आले नाही, कारण त्यामागे प्रत्यक्ष अनुभवांचे पाठबळ होते.

युद्धवार्ताहर

युद्धभूमीवर उभे राहून बातम्या देणाऱ्या दुर्मिळ युद्धवार्ताहरांमध्ये गाडगीळ होते. भारत-पाकिस्तान यांच्यातली १९६५ व १९७१ची युद्धे, १९६९मधले व्हिएतनाम युद्ध, १९७३मधला अरब-इस्रायल आणि इराण-इराक हे संघर्ष या साऱ्या ठिकाणी गाडगीळ स्वत: पोहोचले. 'हिंदुस्थान समाचार'प्रमाणेच 'बीबीसी' आणि 'रॉयटर्स'सारख्या जागतिक कीर्तीच्या वृत्तसंस्थांसाठीही त्यांनी वार्तांकन केले.

भारत-पाक युद्धानंतर १९६५ साली ताश्कंद येथे तह झाला तेव्हा त्यास्थळी गाडगीळ हजर होते. अमेरिका व्हिएटनामच्या युद्धभूमीवर ज्या भयानक चुका करीत होती त्याचे ते साक्षीदार होते. वयाच्या ६३व्या वर्षी मिलिंद गाडगीळ हे पाकिस्तानी सैनिक भारतावर तोफा डागत होते त्यावेळी बटालिकच्या संग्रामस्थळी होते.

गाडगीळ यांनी सकाळ, नवशक्ती, तरुण भारत या दैनिकांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या. अनेक नियतकालिकांमध्ये ते सतत अभ्यासपूर्ण लिहीत. 'विश्व संवाद केंदा'ने प्रकाशित केलेला 'नॅशनल सिक्युरिटी: अॅन ओव्हरव्ह्यू' हा गंथ गाडगीळ यांनी संपादित केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्यांच्या निष्ठेचा विषय. त्यामुळे सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची जबाबदारी त्यांनी आत्मीयतेने सांभाळली. स्वातंत्र्यवीरांनी फ्रान्सच्या मासेर्लिस बंदराजवळ जी ऐतिहासिक उडी घेतली तिचे त्या किनाऱ्यावर स्मारक व्हावे, अशी तळमळ गाडगीळांना लागून राहिली होती. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले.