Jump to content

"शां.ग. महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१: ओळ ३१:
* ‘रामेश्वरम् ने राष्ट्रपती भवन’ या नावाचे डॉ. अब्दुल कलाम यांचे चरित्र
* ‘रामेश्वरम् ने राष्ट्रपती भवन’ या नावाचे डॉ. अब्दुल कलाम यांचे चरित्र
* वाचन संस्कृती जोपासावी
* वाचन संस्कृती जोपासावी
* हसत खेळत एम.फिल’ करा
* हसत खेळत एम.फिल. करा
* हिमालयातील चारीधाम यात्रा
* हिमालयातील चारीधाम यात्रा

==शां.ग. महाजन यांच्या विषयी लिहिली गेलेली पुस्तके==
* नामवंत ग्रंथपाल डॉ. शां.ग. महाजन व्यक्ती आणि कार्य (डॉ. नीता पाटील)

==शां.ग. महाजन यांना मिळालेले पुरस्कार==
* पुणे शहराचा ज्ञानकोश या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी पुरस्कार
* आणि जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार

२२:१८, १५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

शां.ग. महाजन (जन्म : १९३२) हे पुणे विद्यापीठात ग्रंथपाल आणि प्राध्यापक होते. गंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून १९९२ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांत त्यांनी ५० पुस्तके लिहिली.

निवृत्त झाल्यावर महाजनांनी चारीधाम यात्रा केल्या आणि त्यावर आधारित ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले.

ग्रंथालयशास्त्रावरील अभ्यासक्रम आणि पुस्तके

शां.ग. महाजन यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये मराठीतून बी.लिब. हा ग्रंथपालविषयक शिक्षणक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी ३३ ग्रंथांची निर्मिती इतर लेखकांच्या साहाय्याने केली. त्यामध्ये महाजनांचे संपूर्णपणे स्वतःचे असे सहा ग्रंथ होते. बी.लिब. नंतर शां.ग. महाजनांनी एम.लिब. शिक्षणक्रम विकसित केला, व त्यासाठी दप्तरखाने व वस्तुसंग्रहालये हा ग्रंथ लिहिला.

महाजन नंतर दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात गेले, तेथॆ जाऊन बी.लिब. आणि एम.लिब. या शिक्षणक्रमात सुधारणा केल्या आणि नंतर पीएच.डी. शिक्षणक्रम विकसित करण्यासाठी सहभाग घेतला.

याच कालखंडात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी १४ पुस्तके लिहिली.

एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन

महाजनांनी २५ वर्षात ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. ५ विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी मार्गदर्शन केले. त्यानंतर एमफिल, पीएच.डी.साठी ११ ग्रंथ लिहिले. त्यातील ‘हसत खेळत एम फिल करा’, ‘वाचन संस्कृती जोपासावी’ हे ग्रंथ गाजले.

पुणे शहरासंबंधी ग्रंथ

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनसाठी महाजनांनी पुणे शहराच्या इतिहासाची साधने हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला आणि २००० मध्ये पुणे शहर सूची हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर २००४ मध्ये पुणे शहराचा ज्ञानकोश हा संदर्भग्रंथ प्रसिद्ध केला. महाजनांनी पुणे शहरविषयी एकूण १२ ग्रंथ लिहिले आहेत.

वृत्तपत्रांत सदर लेखन

  • शां.ग. महाजन यांनी दैनिक ‘लोकसत्ता’च्या ‘नवनीत’ या पुरवणीमध्ये १ ऑक्टोबर २००१ ते ३१ डिसेंबर २००३ पर्यंत ‘दिनविशेष’ हे सदर लिहिले.
  • १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २००४ या काळात ‘इतिहासात आज’ हे सदर लिहिले.

शां.ग. महाजन यांनी लिहिलेली पुस्तके

  • आत्मचरित्र (दोन खंड)
  • एम.फिल., पीएच.डी.साठी ९ ग्रंथ
  • ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी १४ पुस्तके
  • दप्तरखाने व वस्तुसंग्रहालये
  • नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू
  • पुणे शहर सूची
  • पुणे शहराचा ज्ञानकोश (३ खंड)
  • बी.लिब.साठी मराठी पुस्तके ३३ सहनिर्मित अधिक ६ स्वतंत्र
  • ‘रामेश्वरम् ने राष्ट्रपती भवन’ या नावाचे डॉ. अब्दुल कलाम यांचे चरित्र
  • वाचन संस्कृती जोपासावी
  • हसत खेळत एम.फिल. करा
  • हिमालयातील चारीधाम यात्रा

शां.ग. महाजन यांच्या विषयी लिहिली गेलेली पुस्तके

  • नामवंत ग्रंथपाल डॉ. शां.ग. महाजन व्यक्ती आणि कार्य (डॉ. नीता पाटील)

शां.ग. महाजन यांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे शहराचा ज्ञानकोश या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी पुरस्कार
  • आणि जयंतराव टिळक स्मृती पुरस्कार