Jump to content

"शां.ग. महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शां.ग. महाजन (जन्म : १९३२) हे पुणे विद्यापीठात ग्रंथपाल आणि प्राध्य...
(काही फरक नाही)

२२:११, १५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

शां.ग. महाजन (जन्म : १९३२) हे पुणे विद्यापीठात ग्रंथपाल आणि प्राध्यापक होते. गंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून १९९२ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरच्या २५ वर्षांत त्यांनी ५० पुस्तके लिहिली.

निवृत्त झाल्यावर महाजनांनी चारीधाम यात्रा केल्या आणि त्यावर आधारित ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले.

ग्रंथालयशास्त्रावरील अभ्यासक्रम आणि पुस्तके

शां.ग. महाजन यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये मराठीतून बी.लिब. हा ग्रंथपालविषयक शिक्षणक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी ३३ ग्रंथांची निर्मिती इतर लेखकांच्या साहाय्याने केली. त्यामध्ये महाजनांचे संपूर्णपणे स्वतःचे असे सहा ग्रंथ होते. बी.लिब. नंतर शां.ग. महाजनांनी एम.लिब. शिक्षणक्रम विकसित केला, व त्यासाठी दप्तरखाने व वस्तुसंग्रहालये हा ग्रंथ लिहिला.

महाजन नंतर दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात गेले, तेथॆ जाऊन बी.लिब. आणि एम.लिब. या शिक्षणक्रमात सुधारणा केल्या आणि नंतर पीएच.डी. शिक्षणक्रम विकसित करण्यासाठी सहभाग घेतला.

याच कालखंडात ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गासाठी १४ पुस्तके लिहिली.