Jump to content

"वसंत डावखरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वसंत डावखरे (जन्म : १९४९; मृत्यू : ४ जानेवारी २०१८) यांचे हे शेतकरी क...
(काही फरक नाही)

२२:१५, ५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

वसंत डावखरे (जन्म : १९४९; मृत्यू : ४ जानेवारी २०१८) यांचे हे शेतकरी कुटुबात जन्माला आले. शिक्षणासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला. हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. २५ मे १९९ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर वसंत डावखरे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले.

१९८६ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत डावखरे हे नौपाड्यातून काँग्रेसपक्षातर्फे नगरसेवक म्हणून विजयी झाले. १९८६-८७ साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले. ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून डावखरे यांची ख्याती होती. त्यानंतर १९९२ पासून चार वेळा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९८ मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते. २०१६च्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

लष्करे तोयबाची कुप्रसिद्ध दहशतवादी इशरत जहाँ हिला गुजराथ पोलिसांनी मारून टाकल्यानंतर, डावखरे यांनी तिच्या कुटुंबीयांना व्यक्तिगतरीत्या एक लाख रुपयांची मदत केल्याने त्यांच्या कारकीर्दीवर न पुसणारा कलंक लागला.