"खरमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: खरमासाची पौराणिक कहाणी अशी आहे. भगवान सूर्यदेव सात घोड्यांच्या... |
(काही फरक नाही)
|
२३:१५, २८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
खरमासाची पौराणिक कहाणी अशी आहे.
भगवान सूर्यदेव सात घोड्यांच्या रथात बसून ब्रह्मांडाची परिक्रमा करतात. त्यांना मध्येच थांबण्याची परवानगी नाही. परंतु असे करताना घोड्यांना विश्रांती न मिळाल्याने ते थकतात व त्यांना तहान-भूक लागते. त्यांची ही दशा पाहून एकदा सूर्यदेवांनाही वाईट वाटले. त्यामुळे पाणी पिण्यासाठी सूर्यदेवांनी रथ एका तलावाच्या कडेला नेला. पण जर रथ थांबला तर तर अनर्थ होईल हे जाणून सूर्यदेवांनी तलावाकाठी बसलेल्या दोन गाढवांना रथाला जोडून आपला रथ दौडतच ठेवला. महिन्यानंतर त्याच तलावाजवळ आल्यावर परत रथाला घोडे जुंपले आणि पुढची कालक्रमणा चालूच ठेवली.
हे त्यानंतर दरवर्षी घडू लागले आणि वर्षातून एका महिन्याला खरमास म्हणू लागले. हा खरमास सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या काळात उत्तर भारतात मंगल कार्ये होत नाहीत.
काही पंचांगामध्ये हा खरमास फाल्गुन ते चैत्र आ काळात दाखविलेला असतो.