"प्रदीप गुजराथी (रक्तदाते)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* मनमाड रोटरी क्लबचे रक्तकर्ण गौरव चिन्ह |
* मनमाड रोटरी क्लबचे रक्तकर्ण गौरव चिन्ह |
||
* मुक्ताईनगर साहित्य संमेलनाचा जीवनदाता पुरस्कार |
* मुक्ताईनगर साहित्य संमेलनाचा जीवनदाता पुरस्कार |
||
* नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीच्या संचालकपदी निवड |
* नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीच्या संचालकपदी निवड |
||
* शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्षपद. |
|||
२१:१५, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
मनमाडमध्ये राहणारे प्रदीप गुजराथी हे एक कवी आहेत. ते दूरसंचार विभागात काम करतात.
रक्तदानाबाबत अनेक स्वयंसेवी संस्था जनजागृती करत शिबिरे आयोजित करतात. परंतु प्रदीप गुजराथी यांनी स्वतःला या सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. केवळ लोकांना रक्तदानाचे आवाहन न करता गुजराथी यांनी स्वत: १०० वेळा रक्तदान केले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी रक्तदात्याची सूचीही तयार केली असून त्यांचे या विषयावरचे रक्तदान..घोषवाक्य..उखाणे ..आणखी बरेच.. असणारे ऐक पुस्तक आहे.
रक्तदानावरील काव्य
गुजराथी आपल्या साहित्यकृतीतून नेहमीच रक्तदानाविषयी प्रबोधन करतात. उदा०
माझा वसा रक्तदानाचा, मी रक्ताचे दान मागतो,
तुम्हीसुद्धा करा रक्तदान, मी रक्ताचे वाण मागतो।
अशा त्यांच्या अनेक कविता ते शिबिरांत सादर करतात. रक्तदाता देवदूत ...जातात पळून यमदूत किंवा करा रक्तदानाची घाई ...वाचेल कुणाची तरी आई, अशी काही घोषवाक्येही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी रक्तदानाविषयी उखाणे तयार केले आहेत. चंद्राभोवती आहे तारकांचे रिंगण ..रावांनी बांधलं आहे, रक्तदानाचं कंकण किंवा मंदिरात मंदिर शंकराचे मंदिर, त्याला आहे सोन्याचा कळस, रक्तदान करताना ...राव कधी करत नाही आळस. असली ही साहित्यकृती रक्तदानाबाबतची जनजागृती सर्व स्तरापर्यंत करण्यास उपयोगी पडते.
रक्तदानाचा वसा
सन १९८५पासून गुजराथी रक्तदानाच्या चळवळीत काम करत आहेत. त्यांनी अनकाई येथील आराधना उद्यान केंद्रातील जैन संत हसमुखमुनी यांच्या प्रेरणेने रक्तदानाला सुरुवात केली व नंतर १०० वेळा रक्तदान केले. मनमाड, येवला, नांदगाव, लासलगाव, नाशिक तसेच वागदडीर्, वंजारवाडी यांसारख्या ग्रामीण परिसरात ते रक्तदान शिबिरांचे संयोजन सातत्याने करतात.
रक्तदानाचा प्रचार, प्रसार व्हावा व रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, तरुणांनी निर्भयपणे रक्तदान करून रक्तदानाची चळवळ वाढवावी, रुजवावी एवढाच प्रामाणिक हेतू यामागे आहे, असे ते प्रांजळपणे सांगतात. त्यांनी प्रकाशित केलेेले रक्तदानाविषयीचे पुस्तक ना नफा ना तोटा या तत्त्वावर प्रकाशित केले असून महाराष्ट्रातील सर्व रक्तदान शिबीर संयोजकांना, सर्व सामाजिक संस्थांना व रक्तपेढ्यांना ते पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकाआधी त्यांचा 'रक्तगंध' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून 'जीवन संजीवनी' ही रक्तदात्यांची सुची असलेली पुस्तिका त्यांनी संपादित केली आहे.
रक्तदान कोणी करावे? रक्तदानाची गरज काय? रक्ताचे महत्त्व, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील घोषवाक्ये, उखाणे, कविता यांचा समावेश असलेले त्यांचे पुस्तक मात्र सर्वांनाच उपयोगी आहे.
प्रदीप गुजराथी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचा निष्काम कर्मयोगी पुरस्कार
- ठाणे येथील रक्तानंद संस्थेचा रक्तकर्ण पुरस्कार
- धुळगावच्या सत्यवादी नागरी कृती समितीचा जीवन संजीवनी पुरस्कार
- मनमाड रोटरी क्लबचे रक्तकर्ण गौरव चिन्ह
- मुक्ताईनगर साहित्य संमेलनाचा जीवनदाता पुरस्कार
- नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीच्या संचालकपदी निवड
- शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्षपद.