Jump to content

"मुकाम्बिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कर्नाटकातल्या कोलूर गावी मुकाम्बिका देवीचे प्रसिद्ध देऊळ आहे....
(काही फरक नाही)

२०:५३, १७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

कर्नाटकातल्या कोलूर गावी मुकाम्बिका देवीचे प्रसिद्ध देऊळ आहे. देवळाच्या पूर्व दरवाज्याजवळ अग्नितीर्थ नदी आहे. ही नदी सौपर्णिका नदीचीच एक शाखा आहे. या नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन भाविक मुकाम्बिका देवीच्या मंदिरात प्रवेश करतात.

कोलूर गाव निसर्गरम्य कर्नाटकातल्या कुडजाद्री पर्वताच्या टेकड्यांच्या परिसरात आहे. या पर्वतातून सौपर्णिकासारख्या आणखीही काही नद्या उगम पावतात. नद्यांवरचे अनेक धबधबे या भागात आहेत.

कोलूर हे ठिकाण कुंदापूरपासून ४५ किमीवर आणि उडुपीपासून ७० किमीवर आहे. भटकळ हे गाव कोलूरपासून ३०-३५ किमीवर आहे. रेल्वेने गेल्यास उडुपी येथे उतरून कर्नाटक राज्याच्या एस.टीने जाणे सोयीचे पडते.

आख्यायिका

कर्नाटकात कोलन नावाच्या ऋषीचे वास्तव्य होते. ते शिवभक्त होते. तेथे असले्या शिवलिंगाची ते पूजा करीत असत. कामासुर नावाचा दानव त्यांच्या तपश्चर्येत विघ्ने आणीत असे. देवांनाही हा दानव डोईजड होईल असे वाटल्याने त्यांनी देवीला त्याचा बंदोबस्त कारायला सांगितले. देवीने कामासुराची वाचा बंद केली आणि तो मुकासुर झाला. अशा मुक्या कामासुराचा देवीने वध केला म्हणून तिला मुकाम्बिका म्हणू लागले.

देवळाचे वर्णन

मुकाम्बिका देवीचे हे मंदिर इसवी सनाच्या १०व्या शतकात बांधले गेले. ग्रेनाईटच्या पथ्थरात बांधलेले हे देऊळ बैठ्या स्वरूपात आहे. मंदिराचा कळस दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरांना असतो तसा गोपुरासारखा द्राविड शैलीतला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उंच दीपस्तंभ आणि ध्वजस्तंभ आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर लक्ष्मीमंडप लागपत. तेथे असलेल्या दगडी खांबांवर देवदेवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत.

देवीची मूर्ती असलेलल्या गाभाऱ्याचे बांधकाम फार प्राचीन पद्धतीचे आहे.