"धर्मपाल कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: धर्मपाल कांबळे (जन्म : इ.स. १९६२; मृत्यू : पुणे, ९ डिसेंबर २०१७) हे एक... |
(काही फरक नाही)
|
१२:४५, १४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
धर्मपाल कांबळे (जन्म : इ.स. १९६२; मृत्यू : पुणे, ९ डिसेंबर २०१७) हे एक साहित्यिक, संशोधक आणि मराठी लेखक होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण वाड्मयाचे संपादन करून त्याचे तीन खंड प्रसिद्ध केले होते. त्यांनीच अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ घराचा शोध लावला.
धर्मपाल कांबळे हे पुण्यातील मार्केट यार्ड येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनची नोकरी करीत होते. त्यांनी 'अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र' आणि 'शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा' ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती..
धर्मपाल कांबळे यांची पुस्तके
- अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र (संपादित)
- अण्णा भाऊ साठे - आंबेडकर चळवळीचे वारसदार (लेख)
- प्रबोधनकार केशवसीताराम ठाकरे : व्यक्तित्व, कार्य, साहित्य
- संक्षिप्त रूपांतर-भारतीय राज्यघटना
- मृत्यूकडून जीवनाकडे
- भारतरत्न राजीव गांधी
- शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा
- राज्यपाल सुशीलकुमार शिंदे
धर्मपाल कांबळे यांना मिळालेले पुरस्कार
- पुणे पोस्ट्स टेलिकॉम सोसायटीच्या वतीने 'गुणवंत कामगार पुरस्कार'
- नाट्य चित्र कला अकादमीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिक पुरस्कार