Jump to content

"डिक्शनरी ऑफ नॅशनल बायोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफ...
(काही फरक नाही)

१८:१७, १० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज’ या चरित्रकोशाचे आजवर एकूण साठ खंड प्रकाशित झालेले आहेत! विशेषत: युनायटेड किंग्डममधील गेल्या दोन हजार वर्षांमध्ये होऊन गेलेल्या समाज, शेती, उद्योग, व्यापार, साहित्य, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र, सर्व प्रकारच्या मानवी कला, आदी शेकडो क्षेत्रांमधील मान्यवरांची साधार व चिकित्सक चरित्रे या खंडांमध्ये प्रकाशित झालेली आहेत. एकूण सुमारे एक लाख वीस हजारांहून अधिक मान्यवरांची माहिती या कोशात दिली आहे. त्या कोशासाठी आजवर सुमारे दहा हजार तज्ज्ञांनी काम केले आहे. हे काम अवाढव्य असून अतिशय उपयुक्त आहे.