"शिवगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. राधानगरी तालुक्य...
(काही फरक नाही)

२०:३९, ८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

शिवगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यात हा किल्ला दडला आहे.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. या अभयारण्यात अपरिचित असा शिवगड किल्ला आहे. मालवण, आचरा इत्यादी तळकोकणातील बंदरांत उतरणारा माल अनेक घाटमार्गांनी सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठांत जात असे. अशा घाटमार्गांपैकीच फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडाची उभारणी करण्यात आली होती. राधानगरी व कळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या व जीववैविध्यतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देतात, पण अभयारण्यातच असलेला शिवगड पाहाण्यास फारसे पर्यटक फिरकत नाहीत.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, पण दाजीपूर गावात होऊ शकेल.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

==राहण्यासाठी खोल्या==: गडावर रहाण्याची सोय नाही, पण दाजीपूर अभयारण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहाण्याची सोय आहे.