"कुमुदच्या आईची लेक (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुमुदच्या आईची लेक हे कुमुद अोक यांनी वयाच्या ९२व्या वर्षी लिहि...
(काही फरक नाही)

२३:३८, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

कुमुदच्या आईची लेक हे कुमुद अोक यांनी वयाच्या ९२व्या वर्षी लिहिलेले आत्मचरित्र आहे.

कुमुद नारायण म्हसकर यांचा जन्म १९२० साली अंमळनेरमध्ये एका संपन्न कुटुंबात झाला. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंब असल्याने त्यांनी गावात राहूनही शिक्षण घेतले. क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवले. पुढे पुणयात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेऊन एसएनडीटी विद्यापीठात प्राध्यापकी केली. पुढे समाजवादी स्वातंत्रसैनिक रावसाहेब यांच्याशी लग्न करून कुमुद म्हसकर या कुमुद अोक होऊन नाशिकला स्थिरावल्या.

पुस्तकात कुमुद अोक यांनी आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. विसाव्या शतकातून २१वे शतक अोलांडताना अनुभवलेली स्थित्यंतरे याबद्दलही लिहिले आहे.