Jump to content

"निम्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निम्मी (जन्म : फतेह अबाद (आग्रा), १८ फेब्रुवारी १९३३) या एक हिंदी चित...
(काही फरक नाही)

२१:१०, ५ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

निम्मी (जन्म : फतेह अबाद (आग्रा), १८ फेब्रुवारी १९३३) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आहेत. बरसात सिनेमातल्या ग्रामीण मुलीच्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेरा-चौदा होते.

निम्मी यांचे आजोबा जमीनदार होते. त्यांना इंग्रज सरकारने नबाब हा किताब द्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. किताब मिळाला नाही, पण त्याऐवजी आपल्या मुलीला- वहिदनला झालेल्या कन्येचे नावच त्यांनी नबाबबानू ठेवले. निम्मीचे वडील अब्दुल हकीम .हे काँट्रॅक्टर होते, तर आई वहिदन या त्या काळच्या लोकप्रिय गायिका व अभिनेत्री होत्या. मावशी सितारा बेगम ज्योती या नावाने चित्रपटांत कामे करीत. त्यांचे लग्न पार्श्वगायक जी. एम. दुराणी यांच्याबरोबर झाले होते.

निम्मी अकरा वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. आजीने पालनपोषणाची जबाबदारी घेतली. तिथले वातावरण हिंसक झाल्याने आजीने निम्मीला घेऊन थेट मुंबई गाठली. त्या दोघी पूर्वपरिचय असलेल्या मेहबूबखान यांच्याकडे गेल्या. मेहबूबखान सेन्ट्रल स्टुडिअोत `अंदाज' चित्रपटाचे शूटिंग करत होते. नर्गिसच्या आई जद्दनबाई यांच्या शेजारी बसून शूटिंग पहात असताना निम्मी या राज कपूर यांच्या नजरेस पडल्या. त्यांना ही मुलगी इतकी आवडली की त्यांनी निम्मीला बरसात चित्रपटासाठी निवडले. निम्मी हे नाव राज कपूर यांनीच ठेवले.

निम्मी यांचे लग्न पटकथा लेखक अली रझा (निधन २००७) यांच्याशी झाले. त्यांना मूलबाळ झाले नाही.

निम्मीने आयुष्यभर दुय्यम नायिकेच्या भूमिका केल्या, पण प्रत्येक भूमिकेत त्यांच्या वाट्याला नायिकेपेक्षा अधिक हिट गाणी आली.

निम्मी यांचे चित्रपट

  • अमर
  • आन
  • उडन खटोला
  • दाग
  • पूजा के फूल
  • बरसात


निम्मी यांच्या वाटेला आलेली गाणी (चित्रपट)

  • अल्ला बचायें नौजवानों को
  • आज मेरे संग (आन)
  • एक बात कहूँ
  • खेलो रंग हमारे संग
  • जिया बेकरार है (बरसात)
  • ना मिलता गम (अमर)
  • पतली कमर है (बरसात)
  • बरसात में हम से मिले तुम (बरसात)