Jump to content

"वसंत जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:
* मराठी गौळण
* मराठी गौळण
* मराठीतील बारामास काव्ये
* मराठीतील बारामास काव्ये
* मराठी भाषा व साहित्य संशोधन (खंड १, २ आणि ३) (सहलेखक - म.ना. अदवंत)
* मुक्तेश्वर भावार्थरामायाण
* मुक्तेश्वर भावार्थरामायाण
* संशोधन साधना
* संशोधन साधना

२१:१६, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. वसंत स. जोशी (जन्म - इ.स. १९३० मृत्यू १६ नोव्हेंबर २०१७) हे प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक होते.

मूळचे अक्कोळ (ता. चिक्कोडी) येथील डॉ. जोशी यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण निपाणी, कोल्हापूर व पुणे येथे झाले. सन १९६८मध्ये "एकनाथकृत भावार्थ रामायणाचा विवेचक अभ्यास" या विषयावर त्यांनी केलेली पीएच. डी. ही शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील पहिली पीएच.डी होती. १९६१ ते १९६५पर्यंत ते अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयात व १९९० झालेल्या सेवानिवृत्तीपर्यंत वाईच्या किसनवीर महाविद्यालय येथे पदव्युत्तर विभागाचे प्रमुख होते.

उमेदवारीच्या काळात डॉ. जोशी यांनी दैनिक सत्यवादीत उपसंपादक होते. त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांचे लेखनिक म्हणूनही काम केले. प्राचीन मराठी साहित्याचे संपादन व संशोधन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. महानुभव आणि संत वाङमयावर त्यांनी विपुल लेखन केले. महानुभव संत, ज्ञानदेव चिंतन, मराठी गौळण, संशोधन साधना, मराठी भाषा व साहित्य संशोधन खंड १ व २ आदी किमान १० संशोधनात्मक पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. त्यांच्या ग्रंथांना मराठी अभ्यासकांनी गौरविले व विविध पुरस्कारही मिळाले. पंजाब आणि हैद्राबादमधील मराठी हस्तलिखिताची त्यांनी संपादलेली सूची ही मौलिक संदर्भ साधन म्हणून मान्यताप्राप्त आहे.

मृदू व मितभाषी असूनही मार्मिक आणि मिस्किल टीकाटिपणी करण्यात हातखंडा असलेल्या डॉ. जोशी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व कार्यवाह म्हणून आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक म्हणून १९८५ ते १९८८ पर्यंत काम केले.

ते पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाचे कार्यकारिणी सदस्य होते व १९७४ ते १९७७ या काळात त्या मंडळाच्या त्रैमासिकाचे संपादक होते.

नवभारत या वाईहून प्रसिद्ध होणाऱ्या वैचारिक मासिकाच्या संपादक मंडळातही त्यांनी काम केले होते.

डॉ. वसंत स. जोशी यांची प्रकाशित पुस्तके

  • एकनाथकालीन मराठी वाङ्मय (सहलेखक - डॉ. हे.वि. इनामदार)
  • काही वाङ्मयप्रकार : शोध आणि स्वरूप
  • मद्रासची मराठी हस्तलिखिते
  • मराठी गौळण
  • मराठीतील बारामास काव्ये
  • मराठी भाषा व साहित्य संशोधन (खंड १, २ आणि ३) (सहलेखक - म.ना. अदवंत)
  • मुक्तेश्वर भावार्थरामायाण
  • संशोधन साधना