"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डाॅ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर १९४४; मृत्यू : पुणे, ७ नोव्... |
(काही फरक नाही)
|
२१:००, १० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
डाॅ. सुहासिनी कोरटकर (जन्म : ३० नोव्हेंबर १९४४; मृत्यू : पुणे, ७ नोव्हेंबर २०१७) या भेंडीबाजार घराण्यातल्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या. यांचा जन्म कलाप्रेमी सुधारक विचारांच्या कुटुंबात झाला.
सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. घराण्याची गायकी आत्मसात केल्यावर सुहासिनीताईंना अचानक प्रकृतीच्या विविध तक्रारींनी घेरले. त्यांना सातत्याने कफ, सर्दी, ताप, थंडीचा त्रास सुरू झाला. त्यांची फुप्फुसे कमजोर असल्याने पूर्ण दमसांसाचे घराणेदार गायन त्यांना झेपणार नाही, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. पण गुरूंच्या मार्गदर्शनावर आणि स्वत:च्या साधनेवर विश्वास ठेवत ओंकारसाधना, प्राणायामाने सुहासिनीताईंनी प्रकृतीवर मात केली.