Jump to content

"प्रमोद मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

== कार्य ==
== कार्य ==
छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले आहे. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २ हजार किल्ले पाहिले व त्यांबाबत लेखन केले, त्यांचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.
प्रमोद मांडे यांनी भारतातील कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंतच्या किल्ल्यांपैकी एकूण ६५० किल्ल्यांना स्वतः भेट देऊन त्यांच्या रचनेचा अभ्यास केला.{{संदर्भ हवा}}. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.{{संदर्भ हवा}}.

पप्रमोद मांडे यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. अशा या ध्येयवेड्या इतिहास अभ्यासकाकडे तब्बल १५ हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यासोबत ३ हजार स्लाईड्स, २ लाखांहून अधिक गडकिल्ल्यांचे व भटकंतीचे फोटो, ४५० क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो व तैलचित्रे मांडे यांच्या संग्रही होती. विशेष म्हणजे राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यातून केलेल्या तब्बल ६ हजार ३०० किमीच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी फक्त दोनवेळा प्रवास केला. भेट दिलेल्या किल्ल्यांचा संशोधनपूर्वक अभ्यास करून या मार्गाचे छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील पिढीसाठी ते मोलाचे ठरणारे आहे.

मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे यांनी छत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्र, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत.

पुढच्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरत राहिले. त्यासाठी पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. तब्बल २ हजारांहून अधिक गड किल्ल्यांचा पायी फिरून अभ्यास केलेल्या भाऊंना 'दुर्ग महर्षी' व 'सह्याद्री पूत्र' म्हणूनही उपाधी दिली गेली. इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले नवीन पिढीने प्रत्यक्ष जाऊन पाहिले पाहिजेत यासाठी मांडे आग्रही होते. त्यातूनच त्यांनी हजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी तयार केली होती. शेवटपर्यंत त्यांचा हा ध्यास कायम राहिला..

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.{{संदर्भ हवा}}.

== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==

२१:४६, १७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

प्रमोद मारुती मांडे (जन्म : १९ डिसेंबर इ.स. १९५४; मृत्यू : १७ ऑक्टॊबर २०१७) हे मराठी इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि किल्ल्यांचे गाढे अभ्यासक म्हणून ते विशेष ओळखले जातात.

कार्य

छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचे खरे साक्षीदार असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील गडकिल्ल्यांची भ्रमंती करून मांडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांना हा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष दाखविण्याचे काम केले आहे. मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २ हजार किल्ले पाहिले व त्यांबाबत लेखन केले, त्यांचे छायाचित्रण केले. टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

पप्रमोद मांडे यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर प्रमुख किल्ल्यांनाही प्रत्यक्ष जाऊन पाहिले. अशा या ध्येयवेड्या इतिहास अभ्यासकाकडे तब्बल १५ हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यासोबत ३ हजार स्लाईड्स, २ लाखांहून अधिक गडकिल्ल्यांचे व भटकंतीचे फोटो, ४५० क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो व तैलचित्रे मांडे यांच्या संग्रही होती. विशेष म्हणजे राजगड ते आग्रा व आग्रा ते राजगड असा छत्रपती शिवाजी राजांनी सात राज्यातून केलेल्या तब्बल ६ हजार ३०० किमीच्या प्रवासमार्गावर मांडे यांनी फक्त दोनवेळा प्रवास केला. भेट दिलेल्या किल्ल्यांचा संशोधनपूर्वक अभ्यास करून या मार्गाचे छायाचित्रीकरण त्यांनी केलेले आहे. पुढील पिढीसाठी ते मोलाचे ठरणारे आहे.

मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. मांडे यांनी छत्रपतींचा इतिहास, आझादी के दिवाने हा क्रांतिकारकांच्या जीवनावरील कार्यक्र, शिवरायांची आग्रा मोहीम असे अनेक कार्यक्रम व आतापर्यंत ५ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयांवर दोनशेहून अधिक प्रदर्शने केली आहेत.

पुढच्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती व्हावा, त्याविषयी अभिमान जागृत राहावा यासाठी मांडे सदैव कार्यरत राहिले. त्यासाठी पुणे व्हेंचर्स, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, वडवानल प्रतिष्ठान, भारत इतिहास संशोधक मंडळ, लोकसेवा प्रतिष्ठान, गडकिल्ले सेवा समिती इत्यादी अनेक संस्थांच्या माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.

मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. तब्बल २ हजारांहून अधिक गड किल्ल्यांचा पायी फिरून अभ्यास केलेल्या भाऊंना 'दुर्ग महर्षी' व 'सह्याद्री पूत्र' म्हणूनही उपाधी दिली गेली. इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले नवीन पिढीने प्रत्यक्ष जाऊन पाहिले पाहिजेत यासाठी मांडे आग्रही होते. त्यातूनच त्यांनी हजारो तरुणांची फौज गड किल्ल्यांच्या ट्रेकिंगसाठी तयार केली होती. शेवटपर्यंत त्यांचा हा ध्यास कायम राहिला..

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.[ संदर्भ हवा ].

प्रकाशित साहित्य

  • स्वातंत्र्य संग्रामातील समिधा (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील अंगार (चरित्रकथनात्मक)
  • महाराष्ट्रातील रत्नभांडार
  • गड किल्ले महाराष्ट्राचे