Jump to content

"द्वारकानाथ कौल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंडित द्वारकानाथ कौल हे "नसीम' या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्...
(काही फरक नाही)

२१:२६, १६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

पंडित द्वारकानाथ कौल हे "नसीम' या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील महान शायर पंडित दयाशंकर कौल यांचे चिरंजीव. द्वारकानाथांना अवघ्या २८ वर्षांचेच आयुष्य लाभले, परंतु आपल्या अमर काव्यकृतींच्या रुपाने ते आजही स्मरणात आहेत.

कौल हे काश्मिरी पंडितांचे घराणे. इतर पंडितांप्रमाणे द्वारकानाथही फारसीतून लिहीत असले तरीही ते हिंदू धर्माचे अतिशय अभिमानी. त्यांचा हाच अभिमान काही मुसलमान शायरांना खटकत असे.

एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. पंडित द्वारकानाथ कौल यांनाही निमंत्रण होते. द्वारकानाथांचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी उर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीच्या आधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा. सर्वांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली -

काफीर हैं वो जो बंदे नहीं इस्लामके
अर्थ : इस्लामला न मानणारे काफीर असतात.

काफीर म्हणजे खरेतर 'ईश्वराला न मानणारे'. पण मुस्लीम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ 'इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे' असा करतात. नवाबाने उपरोक्त ओळ दिल्यादिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीआधी दुसरे काहीच लिहिले जाऊ शकत नव्हते, त्यामुळे पंडिजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून इस्लामच्या स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने साऱ्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडित द्वारकानाथ कौल यांना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या.

होता होता पंडितजींची पाळी आली. त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली,

लाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके
काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।<'br/> अर्थ :- 'ल' अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घनश्याम मुरारीचे (फारसीत "ल" ला "लाम असे म्हणतात). काफीरच म्हटले पाहिजे त्यांना, जे भक्त नाहीत या "लाम'चे. ('इस्लामके' नव्हे तर पंडितजींनी फोड केली "इस लामके')
पार नवाबासह सारी सभा अवाक् झाली. पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणाऱ्यांना "काफीर' ठरवले होते. धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडिजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते. पंडितजींची वाहवाह करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता.