"चित्रलेखा पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा .डॉ. चित्रलेखा पुरंदरे या एक मराठी लेखिका आहेत त्या बाबासाह... |
(काही फरक नाही)
|
००:११, १४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
प्रा .डॉ. चित्रलेखा पुरंदरे या एक मराठी लेखिका आहेत त्या बाबासाहेब पुरंदर्यांच्या धाकट्या भावाच्या स्नुषा आहेत. पुण्यामधील नूतन मराठी विद्यालयातील चित्रकला विभागप्रमुख विश्वासराव रामचंद्र उर्फ श्यामराव पुरंदरे (निधन मे २०१७) हे त्यांचे पती.
चित्रलेखा पुरंदरे यांनी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे.
डॉ. चित्रलेखा पुरंदरे या २५हून अधिक वर्षं अध्यापन, लेखन व ग्रंथसंपादन करीत आहेत. विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्वांची त्यांनी लिहिलेली चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अतिशय समृद्ध, प्रासादिक, प्रवाही आणि लालित्यपूर्ण भाषाशैलीसाठी त्या नावाजल्या गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या लेखनाबद्दल काही पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
प्रसिद्ध पुस्तके
- अबोल प्रवासी
- उद्यमशील समाजव्रती (शांतिलाल मुथ्था यांचे हे चरित्र)
- केवड्याचं अत्तर (लघुकथासंग्रह)
- देव दानवां नरे निर्मिले (सहलेखक डॉ. अनिल गांधी)
- राजमान्य राजेश्री (बाबासाहेब पुरंदरे यांचे चरित्र; लेखिकेच्या पीएच.डीच्या प्रबंधावर आधारित)
- विकास आनंदवनाचा
- शिवशाहिरांचे वाङ्मयीन ऐश्वर्य (लेखिकेच्या पीएच.डीच्या प्रबंधावर आधारित)