Jump to content

"शालिनी वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शालिनी वाटवे (जन्म : इ.स. १९३१) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती ...
(काही फरक नाही)

२२:२९, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

शालिनी वाटवे (जन्म : इ.स. १९३१) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे पती बापू वाटवे (पुण्यात ८५व्या वर्षी निधन - ४ मार्च, २००९) हे चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक होते.

शालिनी या रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगरमधील बागायतदाराच्या कन्यका. त्यांना सहा भावंडे होती. शालिनीने शालेय शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचा आग्रह धरल्यानंतर वडिलांनी त्यांना पुण्यातील त्यांच्या भगिनी सुधाताई केळकर यांच्याकडे पाठवले. सुधाताईंचे पती क.वा. केळकर हे फर्ग्युसन कॉलेजचे तत्कालीन उपप्राचार्य होते. फर्ग्युसनच्या आवारातील ६ नंबरच्या दगडी बंगल्यात ते राहात. त्‍यांच्या घरी शालिनीबाईंची रहाण्याची सोय झाली.

शालिनी वाटवे यांनी लिहिलेली पुस्तके

  • पाच पावलं पश्चिमेकडे
  • आठवणीचे आगर (आत्मचरित्र)